आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्‍या, यूपीएससी परीक्षेत झालेले सुधारित नियम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - यूपीएससी म्हणजेच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या वतीने येत्या २३ ऑगस्ट रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात अाले असून, याबाबतचे सुधारित नियम विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या नियमांनुसार परीक्षाकाळात कोणतेही मौल्यवान साहित्य सोबत बाळगण्याच्या, तसेच परीक्षा केंद्रात कोणकोणत्या अटी पाळायच्या आहेत याबद्दलच्या सूचना संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत.

ज्या विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत, त्यांचे इ-प्रवेशपत्र संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले अाहेत. परीक्षा केंद्रावर असलेल्या सुरक्षेच्या नियमांची विद्यार्थ्यांना माहिती असावी कुठलाही गैरप्रकार घडू नये, यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे ठरवून देण्यात आली अाहेत. यामध्ये विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचे आधुनिक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस परीक्षा केंद्रामध्ये आणू नये, असा स्पष्ट उल्लेख करण्यात अाला आहे. यामध्ये प्रामुख्याने कॅल्क्युलेटर, मोबाइल, ब्ल्यू ट्रूथ परीक्षा केंद्र परिसरात आणण्यासदेखील सक्त मनाई करण्यात आली आहे. या परीक्षेसंदर्भात देण्यात आलेल्या सूचनांनुसार कमकुवत दृष्टी असणारे विद्यार्थी, तसेच अपंग विद्यार्थ्यांना रायटर सोबत अाणण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मात्र, याबद्दलचे परवानगीपत्र त्यांना सोबत बाळगणे बंधनकारक असल्याचाही उल्लेख अाहे. ही परीक्षा तीन टप्प्यांमध्ये होणार असून, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे तीन टप्पे असतील. प्रत्येक परीक्षेसाठी वेगळ्या नियमांची तरतूद यूपीएससीकडून करण्यात आली आहे. परीक्षेपूर्वी इ-प्रवेशपत्र यूपीएससीच्या संकेतस्थळांवरून डाउनलोड करण्याचे अावाहन केले असून, यूपीएससीच्या संकेतस्थळावर संपूर्ण नियमावलीदेखील प्रसिद्ध करण्यात अालेली आहे.

पुढे वाचा, काही महत्त्वाचे नियम असे...