आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य एज्युकेशन: एआयपीव्हीटी-2013, पशुवैद्यकीय व पशुसंवर्धन कोर्ससाठी परीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरातील महाविद्यालयांमध्ये पशुवैद्यकीय शास्त्र व पशुसंवर्धन(बीव्हीएससी अँड एएच) आणि पशुसंवर्धनच्या पदवी कोर्स प्रवेशासाठी ऑल इंडिया प्री-व्हेटरनरी टेस्ट(एआयपीव्हीटी) 11 मे रोजी होईल.

स्पर्धा:
@23 व्हेट. कॉलेज
@20 हजार अर्जदार

कोर्स मुदत : दोन्ही कोर्ससाठी पाच वर्षे

पात्रता: बारावीच्या परीक्षेमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्रजीबरोबर सामान्य वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 50 टक्के आणि एससी, एसटी विद्यार्थ्यांसाठी 40 टक्के गुण आवश्यक. वय 17 वर्षांपेक्षा कमी नको.

निकाल : जून 2013

शुल्क : प्रत्येक व्हेटरनरी कॉलेजमध्ये बीव्हीएससी आणि एएच कोर्सेसचे शुल्क वेगळे आहे. राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटरनरी एज्युकेशन अँड रिसर्च, पुदुचेरीमध्ये प्रवेशासाठी 15 हजार 700 रुपये वार्षिक शुल्क द्यावे लागते. वार्षिक ट्यूशन फीस दहा हजार रुपये आहे. गुरू आनंद देव व्हेटरनरी अँड अँनिमल सायन्सेस युनिव्हर्सिटी लुधियानामध्ये प्रवेश शुल्क साधारण 30 हजार रुपये आहे.

15 टक्के जागांसाठी चाचणी होणार
व्हेटरनरी कौन्सिलिंग ऑफ इंडियाद्वारा आयोजित एआयपीव्हीटी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना देशातील 23 पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळेल. या परीक्षेसाठी प्रत्येक व्हेटरनरी कॉलेजमध्ये बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स आणि अँनिमल हजबंडरी कोर्सेसमध्ये 15 टक्के जागा आहेत. उर्वरित जागांसाठी कॉलेज स्वत:ची प्रवेश परीक्षा घेईल.

परीक्षा पद्धती:
तीन तासांच्या परीक्षेत 200 वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न असतील. अभ्यासक्रम 11 वी, 12 वीचा असेल. फिजिक्स, केमिस्ट्रीसाठी प्रत्येकी 60 आणि बायोलॉजीला 80 गुण असतील. त्यात झुऑलॉजी, बॉटनीचे प्रश्न विचारले जातील. मायनस मार्किंग नसेल. त्यात कारणे विचारणारी प्रश्नेही असतील.


ज्ञान: वैदिक काळापासून पशुवैद्यकीयचे अस्तित्व
@सायन्सची सुरुवात वैदिक काळापासूनची आहे. अथर्व वेदात घोडा, हत्तीच्या देखरेखीसाठी आणि त्यांच्या आजाराविषयी उपचारांची माहिती देण्यात आली आहे.

@अशोकाच्या काळात जनावरे आणि माणसांसाठी असलेली रुग्णालये जवळ-जवळच असत. जनावरांच्या डॉक्टरांनाही सरकारकडून जमिनी इनाम दिल्या जात होत्या.
स्रोत : पशुसंवर्धन आणि दुग्ध आणि मत्स्य विभाग.

रंजक: पशूंचे विचित्र जग
@ शहामृगाच्या डोळ्यांचा आकार त्याच्या डोक्यापेक्षा मोठा होता.
@ प्रत्येकी चार लाख सागरी झिंग्यापैकी एकामध्ये जैविक त्रुटी असते. त्याचा रंग गडद निळा होत जातो.
@ माणसाच्या हातांच्या ठशांप्रमाणेच झेब्राच्या पायांचे ठसे वेगवेगळे असतात.
@ डॉल्फीन सहजपणे श्वासोच्छवास घेऊ शकत नाही. श्वास घेण्यासाठी त्यांना खूप कष्ट घ्यावे लागतात. त्यासाठी तयार व्हावे लागते. त्यामुळे ते कधीही गाढ झोप घेऊ शकत नाहीत.

दिव्य मराठी एक्सपर्ट: डॉक्टर डी.के. सिंह द्रोण
(अतिरिक्त संचालक (रिसर्च), बीरसा अँग्रीकल्चर युनिव्हर्सिटी)
अभ्यासक्रमाच्या अध्यापनामध्ये थिअरी, प्रॅक्टिकल आणि प्रोजेक्ट वर्क करून घेतले जाते. क्लासेस इंटरॅक्टिव्ह असतात. प्रॅक्टिकलवर अधिक भर दिला जातो. व्हेटरनरी ओपीडीमध्ये मिळालेल्या प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि आजारी जनावरांना अटेंड केल्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि अनुभव वाढतो. गायीच्या प्रसूतीपूर्व निदानाचे तंत्र विकसित करण्याच्या काळात मग्न असलेली टीम दररोज आठ ते दहा तासांपर्यंत दोन वर्षे काम करत होती. त्यांच्या अथक प्रयत्नाचे फळ म्हणूनच गर्भधारणा केल्याच्या 21 दिवसांनंतर दुधाद्वारे निदान करणे शक्य झाले आहे. अध्ययनाच्या काळात अनेकदा विद्यार्थी आणि शिक्षक 24 ते 28 तासांपर्यंत प्रयोगशाळेत थांबतात. येथील विद्यार्थी राहिलेले डॉक्टर संतकुमार सिंह आणि त्यांच्या टीमने वराहची टीएंडी नावाची प्रजात विकसित केली असून तिची राष्ट्रीय ओळख आहे. त्यासाठी त्यांना डॉक्टर फखरुद्दीन अली अहमद पुरस्कार मिळाला आहे.

इंटरेस्टिंग कोट
“Until one has loved an animal, a part of one's soul remains unawakened.” Anatole France
जोपर्यंत तुम्ही एखाद्या प्राण्यावर प्रेम करणार नाहीत, तोपर्यंत तुमच्या आत्म्याचा एक अंश जागृत होणार नाही.

प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा : 8082005060 यावर किंवा मेल करा: (education@dainikbhaskargroup.com)