आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CEEB 2013 : Biotech Courses Entrance Examination

सीईईबी-2013 : बायोटेक कोर्सेसमध्ये प्रवेशासाठी परीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बायोटेक्नॉलॉजीच्या वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये प्रवेशासाठी कंबाइंड एंट्रन्स एग्झाम फॉर बायोटेक्नॉलॉजी(सीईईबी) 18 ते 21 मेपर्यंत होणार. याच्यामार्फत विद्यार्थी 55 विद्यापीठांच्या बायोटेक्नॉलॉजी कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकतील. परीक्षा जवाहरलाल नेहरू विद्यापीठ घेईल.
स्पर्धा
55विद्यापीठे (जवळपास) /80 हजार अर्जदार
कोर्स मुदत : प्रत्येक कोर्ससाठी दोन वर्षे


पात्रता
एमएससी बायोटेक व एमएससी(कृषी) बायोटेकसाठी बीएससीमध्ये 55 टक्के गुण. वेगवेगळ्या विद्यापीठांसाठी वेगवेगळे कटऑफ मार्क्स. एमटेक बायोटेकसाठी बीएससीमध्ये 60 टक्के गुण आवश्यक. 2011 किंवा त्यानंतर पदवी परीक्षा देणारे विद्यार्थी यासाठी पात्र.


निकाल : जून 2013


शुल्क : प्रत्येक विद्यापीठात बायोटेक विषयातील एमएससी व एमटेक कोर्सचे शुल्क वेगवेगळे. जेएनयूमध्ये तीन कोर्ससाठी प्रति सेमिस्टरसाठी 40 हजार रुपये शुल्क आहे. तर वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये 75 हजार रु.प्रति सेमिस्टर आहे.


कमी झाली गुंतवणूक
नव्या शतकाच्या सुरुवातीस भारतात बायोटेक क्षेत्रात वार्षिक 1000-1500 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक झाली होती. 2012 मध्ये ती कमी होत 130 कोटी रुपये झाली आहे. यासाठी सरकारचे धोरण जबाबदार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


इनटेकच्या दुप्पट विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट होईल
निकालानंतर विद्यापीठे इनटेकच्या दुप्पट विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट तयार केली जाईल. यानंतर विद्यार्थ्यांना उपलब्ध जागांची माहिती दिली जाईल. विद्यार्थी आपला पसंतीक्रम देतील. त्यानंतर गुणवत्ता यादीनुसार प्रवेश मिळू शकेल.


परीक्षा पद्धती
तीन तासांच्या परीक्षेमध्ये बहुपर्यायी प्रश्न असतील. एमएससी बायोटेक आणि एमएससी (कृषी) बायोटेकचे दोन भाग असतील. पहिल्या भागात योग्य उत्तरासाठी एक गुण, तर चुकीच्या उत्तरासाठी अर्धा गुण कापला जाईल. दुसºया भागात योग्य उत्तरासाठी तीन गुण, तर चुकीच्या उत्तरासाठी एक गुण कापला जाईल. एमटेक बायोटेकच्या टेक्नॉलॉजी व लाइफ सायन्स शाखेचे तीन भाग असतील. परीक्षेत बारावीपर्यंतचे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथ्ससोबत सीईईबीच्या अभ्यासक्रमातील प्रश्न असतील.


ज्ञान
शेतीतून सुरुवात झाली बायोटेक्नॉलॉजीची
हंगेरीचे अभियंते कार्ल एरेकी यांनी 1919 मध्ये बायोटेक्नॉलॉजी हा शब्द दिला. बायोटेक्नॉलॉजीची सुरुवात नियालिथिक क्रांतीदरम्यान झाली. काही सूक्ष्म जिवाणूंच्या मदतीने शेती आणखी चांगली करता येईल, असे त्या वेळी शेतक-यांच्या लक्षात आले. याबरोबर खतांवर प्रक्रिया करून कीटकनाशके व नायट्रोजन मिळवता येईल.


रंजक
चित्रपटांत बायोटेक्नॉलॉजी
@ ज्युरासिक पार्क चित्रपटात नष्ट झालेल्या डायनासोरची प्रजाती दुसºयांदा जिवंत करण्यासाठी क्लोनिंगची माहिती दिली आहे.
@ एक्स-मॅनमध्ये माणसांमध्ये होणारे जनुकीय बदल म्हणजे ‘म्युटेशन’बाबत माहिती दिली आहे.
@ स्पेसीजमध्ये परग्रहावरील प्राण्यांच्या गुणसूत्रांमध्ये होणारे बदल दाखवण्यात आले आहेत.
@ दशावतारमध्ये बायो वेपन्स आणि ‘केऑस थेअरी’संदर्भात माहिती देण्यात आली आहे.

प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा 8082005060 यावर किंवा मेल करा education@dainikbhaskargroup.com