आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य एज्युकेशन: पीएटी - 2013; कृषी महाविद्यालयांचीप्रवेशपूर्व परीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन राज्यांतील कृषी महाविद्यालयांचीप्रवेशपूर्व परीक्षा
मध्य प्रदेश,राजस्थान आणि छत्तीसगडच्या सरकारी व खासगी कृषी महाविद्यालयातील प्रवेशासाठी मे आणि जून महिन्यात परीक्षा होणार आहे. मध्य प्रदेशात बी.टेक. ( अ‍ॅग्रिकल्चर आणि इंजिनिअरिंग ) मध्येही या प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश मिळू शकेल. तर राजस्थानात कृ षी, फ लसंवर्धन आणि होम सायन्सच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमातील प्रवेशासाठीही यासोबतच जेईटी होणार आहे.

स्पर्धा-

राज्य म. प्र. छत्तीसगड राजस्थान
जागा 660 1172 1080
अर्जदार 25 हजार 30 हजार 20 हजार

परीक्षा : 26 मे (मप्र), 23 मे (छत्तीसगड), 2 जून (राज.)

पात्रता-
>मध्य प्रदेश: बीटेकसाठी पीसीएम, इतरांसाठी 12 वीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स,बायोलॉजी, अ‍ॅग्रिकल्चर

> छत्तीसगड: अ‍ॅग्रिकल्चर, बायोलॉजी अथवा मॅथ्समध्ये 50 टक्के गुणांसह 12 परीक्षा उत्तीर्ण

> राजस्थान: फिजिक्स, केमिस्ट्री, अ‍ॅग्रिकल्चर, बायोलॉजी अथवा मॅथ्ससह 12 परीक्षा 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण

निकाल : जून -2013

परीक्षेची पद्धत
>मप्रमध्ये कृषी अभ्यासक्रमासाठी फिजीक्समध्ये 50, केमिस्ट्री 50,आणि अ‍ॅग्रीकल्चरचे 100 प्रश्न.
>छत्तीसगडमध्ये 2 तासाची परिक्षा असते.यामध्ये 200 प्रश्न बहुविध पर्यायाचे असतात.
>राजस्थानात तीन तासांची परिक्षा असते.अ‍ॅग्रीकल्चर,बायो,मॅथ्स,केमिस्ट्री,फिजीक्स यापैकी कोणतेही तीन सोडवावे लागतात.

शुल्क : मध्य प्रदेशातील सरकारी महाविद्यालयांमध्ये सर्वसाधारण जागेसाठी दरवर्षी 1200 ते 1800 फीस असते. पेमेंट सीटसाठी 35 हजार रुपये दरवर्षी. राजस्थानात सरकारी महाविद्यालयांमध्ये पहिल्या सेमिस्टरसाठी 8 हजार रुपये व त्यानंतरच्या प्रत्येक सेमिस्टरसाठी 5 हजार रुपये फिस आकारली जाते.तर छत्तीसगडमध्ये सरकारी महाविद्यालयांमध्ये 4500 रुपये व खासगीमध्ये दरवर्षी 20 हजार रुपये फीस आकारली जाते.

कमी खर्चात शिक्षण, नोकर्‍याही अधिक
कृषी अभ्यासक्रमासाठी बायोलॉजी किंवा गणित घेऊन 12 वी करणार्‍या विद्यार्थी परीक्षेला पात्र असतात. एमबीबीएस किंवा इंजिनियरिंग अभ्यासक्रमासाठी फीस लाखो रुपयांत असते. परंतु कृषी अभ्यासक्रमाची फीस तुलनेने कमी असते. त्याचबरोबर कोर्स पूर्ण होताच सरकारी किंवा खासगी क्षेत्रात नोकरीची संधी अधिक असते. 2012 मध्ये छत्तीसगडमध्ये सरकारी आणि खासगी महाविद्यालयातील सार्‍या जागा तीन दिवसांत भरल्या होत्या. त्यानंतर जागांची संख्या 25 टक्क्यांनी वाढवण्यात आली होती. त्या जागाही नंतरच्या एका दिवसात भरल्या.

ज्ञान-श्वेत-नील क्रांतीने चित्र बदलले
भारताची अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार कृषी आहे. परंतु देशाची कृषी उत्पादकता खूप कमी होती. मेक्सिकोमधील हरित क्रांतीच्या पार्श्वभूमीवर 1965 मध्ये भारतात कृषी क्षेत्रात उच्च् दर्जाचे बियाणे आणि खतांचा उपयोग सुरू झाला. यातून अन्नधान्य उत्पादनात देश स्वावलंबी बनला. 1970 मध्ये नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट मंडळाची स्थापना झाली. त्यानंतर श्वेत क्रांतीद्वारे भारतात दूध उत्पादन विक्रमी पातळीवर नेण्यात आले. त्यामुळे देश जगात अव्वल स्थानी पोहचला. 1973 मध्ये सुरू झालेल्या निल क्रांतीने (ब्ल्यू) घट होणार्‍या मत्स्य उत्पादनात सहा लाख टनहून 50 लाख टन एवढी वाढ करण्यात यश आले.

रंजक- गाईच्या दुधापेक्षा बकरीचे दूध लवकर पचणारे
@ शरीरात पचनक्रियेच्या काळात गायीच्या दूधाला पचण्यास एक तास लागतो. तुलनेने बकरीचे दूध पचण्यास 20 मिनिटे लागतात.
@ एक गॅलन आइस्क्रीम तयार करण्यासाठी सुमारे 1.4 गॅलन दूधाची गरज असते.
@ उंटनीच्या दुधात इन्सुलीन आणि अँटीबॉडीज अधिक असतात आणि हे दूध मधुमेहासह अन्य आजारांनाही नियंत्रित करण्यास सहाय्यक ठरते.

दिव्य मराठी एक्सपर्ट- डॉक्टर ओ.पी. कश्यप; (अधिष्ठाता, इंदिरा गांधी अ‍ॅग्रिकल्चर कॉलेज, जयपूर)
महाविद्यालयात आल्यानंतर अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर लक्ष दिले जाते. प्रत्येक महिन्याला विशेष वर्गाद्वारे, वर्कशॉप, सेमिनारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कृषीमध्ये कशाप्रकारे संधी आहेत, याची माहिती दिली जाते. थिअरी बरोबरच प्रॅक्टिकलवर अधिक लक्ष दिले जाते. त्यांना क्षेत्र अध्ययनावर पाठवले जाते. चार वर्षांच्या अभ्यासक्रमात विद्यार्थी तिसर्‍या वर्षी फिल्डला पूर्णपणे जोडले जातात. विद्यार्थ्यांना स्वत: उत्पादन तयार करून ते विकण्याचे प्रशिक्षण दिले जाते. शरबत तयार करणे, नर्सरी प्लांट, मधमाशी पालन इत्यादी. यातून जी कमाई होते, त्यामधील निम्मे पैसे कॉलेजला आणि निम्मे विद्यार्थ्यांमध्ये वाटले जातात. कृषीच्या क्षेत्रात सध्या बियाणे, खते, एनजीओ, बँकिंग क्षेत्रात नोकरींच्या खूप संधी आहेत. बीएससीनंतर जवळपास सर्व विद्यार्थ्यांना नोकरी मिळते.

प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा 8082005060 यावर किंवा मेल करा: education@dainikbhaskargroup.com