आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • FDDI 2013 : Design MBA Cours Entrance Examination

एफडीडीआय-2013 : डिझाइन-एमबीए कोर्ससाठी प्रवेश परीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुटवेअर डिझाइन अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटच्या फॅशन, डिझाइन, रिटेल आणि मॅनेजमेंटच्या पदवी तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन राष्ट्रीय पातळीवरील निवड चाचणी 14, 15, 16 जून रोजी होणार आहे.


स्पर्धा

1680 एकूण जागा/ 14000 अर्ज
750 जागा पदवी, 450 जागा पदव्युत्तर, 480 जागा इंटिग्रेटेड प्रोग्रामसाठी.
पात्रता
पदवी अभ्यासक्रमासाठी 12 वी परीक्षा उत्तीर्ण.
पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी संबंधित विषयातील पदवीधर.


निकाल : जुलैचा पहिला आठवडा
शुल्क : पदवी अभ्यासक्रमासाठी 60 हजार रुपये आणि पीजीसाठी 75 हजार रुपये प्रति सेमिस्टर. सेंट्रल फूटवेअर इन्स्टिट्यूटमध्ये दोन वर्षांच्या पदविका कोर्सची एकूण फीस सुमारे 90 हजार रुपये.


अभ्यासक्रम
पदवी : फूटवेअर डिझाइन अँड प्रॉडक्शन मॅनेजमेंट, लेदर गुड्स अँड अ‍ॅक्सेसरीज डिझाइन, फॅशन डिझायनिंग.
पदव्युत्तर पदवी : एमबीए इन फॅशन मर्केंडायझिंग अँड रिटेल मॅनेजमेंट, एमबीए इन फूटवेअर डिझाइन अँड प्रॉडक्शन मॅनेजमेंट, एम. डिझाइन (क्रिएटिव्ह डिझाइन अँड सीएडी / सीएएम)
इंटिग्रेटेड : रिटेल मॅनेजमेंट, बिझनेस मॅनेजमेंट


परीक्षा पद्धत
यूजी : 150 गुणांच्या प्रश्नपत्रिकेत इंग्रजी आणि गणिताच्या 45-45 तसेच सामान्य विज्ञान, सामान्य ज्ञानासाठी 30-30 प्रश्न असतील.
पीजी : 150 गुणांच्या परीक्षेत क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिट्यूड आणि रिझनिंगच्या 45-45 तसेच सामान्य ज्ञान आणि बिझनेस अ‍ॅप्टिट्यूडचे 30-30 प्रश्न असतील.
परीक्षेचा कालावधी : दोन्ही परीक्षांचा कालावधी अडीच तासांचा असेल. सर्व प्रश्न बहुपर्यायी असतील आणि मायनस मार्किंग नसेल.


ज्ञान
पोलिस, हवाई दलासाठी डिझाइन बूट
ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या आदेशानुसार एफडीडीआयने फूटवेअर डिझाइन केले आहेत. दिल्ली, महाराष्ट्र, पंजाब, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यांत पोलिस त्याचा वापर करतात. हवाई दलाच्या अधिकाºयांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे बूट तयार केले आहेत. एफडीडीआयनेच त्याचे डिझाइन केले आहे. दिल्ली महानगरपालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांसाठीदेखील बूटाचे डिझाइन संस्थेद्वारे करण्यात आले आहेत.


रंजक
क्वीन व्हिक्टोरियासाठी पहिला लेडी बूट
० 1840 मध्ये ब्रिटनच्या महाराणीसाठी पहिल्यांदा लेडी बूट डिझाइन करण्यात आला होता.
० फिलिपाइन्सच्या पहिल्या माजी प्रथम महिला इमेल्डा मार्केस यांच्याकडे 3400 जोड्यांचा संग्रह होता. त्यासाठी त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आहे.
० सेंट क्रिस्पीनला शुमेकर्सचा पॅट्रॉन सेंट मानले जाते आणि 25 ऑक्टोबरला सेंट क्रिस्पीन डे साजरा केला जातो.

इंटरेस्टिंग कोट
Our incomes are like our shoes; if too small, they gall and pinch us; but if too large, they cause us to stumble and to trip. -John Locke
आमची आमदनी मोठ्या प्रमाणात पायातील वहाणांसारखीच असते. जर खूप कमी असेल तर टोचू लागते आणि जास्त असेल तर घसरून पडण्याचा धोका असतो.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा 8082005060 यावर किंवा मेल करा education@dainikbhaskargroup.com