आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या जीपॅट -2013 परीक्षेसंबंधीची संपूर्ण माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फार्मसीच्या पदव्युत्तर पदवी कोर्ससाठी परीक्षा
एआयसीटीईच्या पदव्युत्तर पदवी फार्मसी कोर्सेसच्या प्रवेशासाठी होणारी ग्रॅज्युएट फार्मसी अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट(जीपॅट) 16, 17 आणि 18 मे रोजी होईल.

पात्रता
चार वर्षांच्या अभ्यासक्रमाची फार्मसीची पदवी. याबरोबर जे विद्यार्थी बी.फार्मच्या शेवटच्या वर्षाला आहेत, ते पण परीक्षा देऊ शकतात.

निकाल : 31 मे 2013
शुल्क : प्रत्येक फार्मसी कॉलेजचे शुल्क वेगवेगळे आहे. जामिया हमदर्द आणि निरमा विद्यापीठामध्ये एम.फार्माचे वार्षिक शुल्क 90 हजार रुपये आहे. तर नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अ‍ॅँड रिसर्चमध्ये पूर्ण एम. फार्मा कोर्सचे शुल्क केवळ 75 हजार रुपये आहे.

राज्य सरकार बनवणार मेरिट लिस्ट
देशातील 57 शहरांत या वेळी पहिल्यांदा जीपॅट आॅनलाइन परीक्षा होईल. निकालानंतर एआयसीटीई गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांची निवड करेल. निवड प्रक्रिया प्रत्येक राज्य सरकारद्वारे केली जाईल. मेरिट लिस्टनुसार विद्यार्थ्यांना फार्मा कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल. जीपॅट स्कोर कार्ड एक वर्षापर्यंत चालेल.

परीक्षा पद्धती
संगणकावर आधारित तीन तासांच्या आॅनलाइन चाचणीत 125 प्रश्न विचारले जातील. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाची असतील. यामध्ये चार पर्याय दिले जातील. योग्य उत्तरासाठी चार गुण मिळतील तर चुकीच्या उत्तरासाठी एक गुण कापला जाईल.

भारतातून फार्मसीची सुरुवात
*जगातील पहिले मेडिकल कम्पाइलेशन भारतात सुश्रूत संहितेच्या रूपाने बनले. हे ग्रंथ सुश्रूत मुनी आणि चरक मुनी यांनी सहाव्या शतकात लिहिले होते.
*फार्मसीचे दोन चिन्ह अनेक देशांत प्रसिद्ध आहेत. त्यातील एक म्हणजे मॉर्टर अँड पेस्टल आणि दुसरे रेसिपिअर. रेसिपिअरला टाइप करताना आरएक्स लिहिले जाते. वास्तविक 20 व्या शतकापर्यंत ग्लोबदेखील फार्मसीच्या चिन्हाच्या रूपात अनेक देशांत वापरले जात होते.

रंजक
आजारावरील उपचाराचे अनोखे दावे
* पायाचा अंगठा बर्फामध्ये ठेवल्यास चोंदलेल्या नाकाला आराम पडतो, असा दावा 1972 मध्ये काही संशोधकांनी केला होता.
* 1830 मध्ये कॅचअपला (टोमॅटो कॅचअप) अनेक आजारावर औषध म्हणून वापरले जात होते.
* कानाच्या मागील बाजूस दाबल्यास भुकेवर नियंत्रण मिळवता येऊ शकते, असा दावा अ‍ॅक्युपंचरिस्ट्सकडून करण्यात येतो.

दिव्य मराठी एक्स्पर्ट पॅनल

धैर्य आणि सातत्य राखल्यास यश
फार्मसी असे एक करिअर आहे, ज्यात सातत्याने संशोधन सुरू असते. म्हणूनच अभ्यासक्रमात थिअरीऐवजी प्रात्यक्षिकावर अधिक भर असतो. विद्यार्थ्यांना अनेक तास काम करावे लागते. काही वेळा तर वारंवार प्रयोग करूनही निष्कर्ष काढता येत नाही. अशावेळी धीर आणि सातत्य ठेवावे लागते. असेच विद्यार्थी चांगले करिअर बनवू शकतात. फार्मसीमध्ये चार प्रकारचे स्पेशलायझेशन असतात. सध्याच्या काळात फार्माक्युचिप स्पेशलायझेशनची चांगली मागणी आहे. यात प्रचलित औषधांचे फॉर्म्युले विकसित केले जातात. हा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना रेनबेक्सी आणि डॉक्टर रेडिजसारख्या नामांकित फार्मा अँड रिसर्च कंपन्यांत चांगल्या पॅकेजवर सहजपणे नोकरी मिळू शकते. ज्याप्रमाणे आजार वाढू लागले आहेत, त्यावरील नियंत्रणासाठी विशेषज्ञांची मागणीही वाढली आहे. संशोधनाबरोबरच शैक्षणिक पातळीवरदेखील एम फार्मसीला चांगला वाव आहे. क्रीडा क्षेत्रातही ड्रग्ज स्पेशालिस्टची चांगली मागणी आहे.- प्रोफेसर डी.एन. मिश्रा, हिसार डिपार्टमेंट ऑफ फार्मसी, गुरू जंभेश्वर विवि