आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IIMC 2013 Examination Indian Institute Of Mass Comunication

दिव्य एज्युकेशन: आयआयएमसी - 2013; मीडिया कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी परीक्षा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनच्या(आयआयएमसी) पदव्युत्तर पदवी कोर्सेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी 26 मे रोजी परीक्षा होईल. आयआयएमसीच्या ढेंकनाल कॅम्पसमध्ये जर्नालिझमची(ओडिसी) परीक्षा 27 मे रोजी होईल.

स्पर्धा-
>385 एकूण जागा
> 4 हजार अर्जदार

पात्रता : पदवी किंवा 2013 मध्ये शेवटच्या वर्षांची परीक्षा देणारा विद्यार्थी

पीजीडीएम 5 कोर्सेससाठी परीक्षा
1. इंग्रजी पत्रकारिता 2. हिंदी पत्रकारिता 3. नभोवाणी आणि दूरचित्रवाणी पत्रकारिता 4. जाहिरात व जनसंपर्क 5. पत्रकारिता(ओडिसी)

निकाल : जूनच्या पहिल्या आठवड्यात
शुल्क : कोर्स 1 आणि कोर्स दोनसाठी 50 हजार रु., कोर्स तीनसाठी 92 हजार रु., कोर्स चारसाठी 70 हजार रु. आणि कोर्स पाचसाठी 28 हजार रु. वार्षिक. जामिया मिलिया इस्लामियाच्या एमजेके मास कम्युनिकेशन रिसर्च सेंटरमध्ये दोन वर्षांच्या एमएचे(जर्नालिझम) शुल्क जवळपास 1.30 लाख रु. माखनलाल चतुर्वेदी युनिव्हर्सिटीमध्ये जवळपास 34 हजार रु. आहे.

6 प्रादेशिक पॅटर्नवर आयआयएमसी
आयआयएमसीचे दोन नवे प्रादेशिक केंद्र अमरावती(महाराष्ट्र), आणि आयझोल(मिझोराम)येथे 2011 मध्ये सुरू करण्यात आली आहेत. संबंधित राज्यातील मीडिया इन्स्टिट्यूटची कमतरता दूर करण्यासाठी ही केंद्रे सुरू करण्यात आली. या व्यतिरिक्त आयआयएमसीची अन्य केंद्रे दिल्ली, जम्मू-काश्मीर, कोट्टायम(केरळ) आणि ढेंकनालमध्ये(ओडिशा) आहेत.

आयआयएमसीमधून डिप्लोमा प्राप्त केलेला गौरव जैन. गौरव व्यवसायाने रिक्षा चालक नाही. मात्र, रिक्षाचालकांच्या आयुष्यावर संशोधन करण्यासाठी त्याने हे काम केले होते. दिल्ली पोलिसांनी नोव्हेंबर 2012 मध्ये त्याला विनाकारण मारहाण केली त्या वेळी तो चर्चेत आला.

परीक्षा पद्धती
दोन तासांच्या प्रवेश परीक्षेमध्ये बहुपर्यायी व दीर्घोत्तरी प्रकारचे प्रश्न विचारले जातात. यामध्ये सामान्य ज्ञान, आंतरराष्टÑीय घडामोडी, सामाजिक इतिहास, सोशल डायनामिक्स, अ‍ॅटिट्यूड आणि मेंटल मेकअप, भाषा ज्ञान, अ‍ॅनॉलिटिकल कॉम्प्रव्हेंशन स्किल्स, जाहिरात आणि जनसंपर्क, ब्रॅँड अवेरनेस अ‍ॅँड रिकॉल किंवा क्वांटिफिकेशन स्किल्सचे प्रश्न असतील.

ज्ञान- आंतरराष्ट्रीय मीडिया विद्यापीठ होणार
@ 17 ऑगस्ट 1965 मध्ये आयआयएमसीची सुरुवात फोर्ड फाउंडेशन आणि युनेस्कोच्या सल्ल्याने झाली होती. त्यात छोटा स्टाफ आणि युनेस्कोचे दोन सदस्य होते.
@2010 मध्ये आयआयएमसी संस्थेस आंतरराष्ट्रीय मीडिया विद्यापीठाचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यासाठी 44 कोटी रुपयांची तरतूद झाली होती.

रंजक- टीव्ही, सिनेमा आणि वृत्तपत्रांत सर्वात पुढे आपण
@ देशात दरवर्षी सुमारे 2, 86 कोटी लोक सिनेमा पाहतात. सिनेमा पाहणाºयांत भारताचे स्थान अव्वल आहे. दुसºया स्थानावर अमेरिका आणि तिसºया स्थानी इंडोनेशिया आहे.
@ भारतात दरवर्षी सरासरी 946 चित्रपट तयार होतात. दुसºया स्थानी अमेरिका आहे. तिसºया स्थानी जपान.
@ भारतात छोटी-मोठी सुमारे 5 हजार दैनिके, साप्ताहिके आहेत. दुसºया स्थानी जर्मनी, तिसºया स्थानी ब्राझील आहे.
स्रोत : युनेस्कोचा अहवाल, सीआयए वर्ल्ड फॅक्ट बुक.

दिव्य मराठी एक्स्पर्ट- प्रोफेसर जयश्री जेठवानी
(हेड, अ‍ॅड-पीआर, आयआयएमसी, दिल्ली)
अभ्यास आणि काम तणावरहित पद्धतीने झाले तर यश हमखास मिळते. आयआयएमसीमध्ये इनोव्हेटिव्ह आणि क्रिएटिव्ह असलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळतो. एंट्रन्स परीक्षेचा अभ्यासक्रमही अशाच प्रकारे तयार करण्यात आला आहे. त्यातून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव मिळेल, असा प्रयत्न करण्यात आला आहे. विद्यार्थिदशेत असताना मीदेखील फॅक्ट्स आणि फीगर लक्षात ठेवत होते. अनेकवेळा तर शिक्षक मंडळीदेखील माझ्याकडून क्रॉसचेक करून घेत. माझा एक विद्यार्थी दीपक अतिशय खोडकर होता; परंतु आज तो मॅक्कन एरिक्सनमध्ये नॅशनल क्रिएटिव्ह डायरेक्टर आहे. अशा विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतो. खरे तर कोणताही विद्यार्थी सामान्य नसतो. प्रत्येकात काहीतरी खास असते. गरज असते ती योग्य दिशेची आणि आपल्या आवडीच्या नोकरीवर लक्ष केंद्रित करण्याची.

इंटरेस्टिंग कोट
“I became a journalist because I did not want to rely on newspapers for information.”
-Christopher Hitchens

माहिती मिळवण्यासाठी वृत्तपत्रांवर अवलंबून राहायचे नव्हते म्हणून मी पत्रकार झालो. प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा 8082005060 यावर किंवा मेल करा
education@dainikbhaskargroup.com