आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनाला सहज बनवते तेच डिझाइन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डिझाइन अभ्यासक्रमासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांमधील रचनात्मकता, आकलन क्षमता आणि वस्तू व घटनांकडे पाहण्याची त्यांची स्वतंत्र दृष्टी, तर्क याच गोष्टी आम्ही पाहतो. हे गुण केवळ डिझाइन अभ्यासक्रमासाठीच नव्हे, तर जीवनाच्या प्रत्येक वळणावर उपयोगी येऊ शकतात. त्याशिवाय विद्यार्थ्याने जिज्ञासू असले पाहिजे. एखाद्या खुर्चीचा कोपरा टोचला तर त्यात कशा प्रकारे बदल करून ती आरामदायी बनवता येईल, याचा विचार विद्यार्थ्याने केला पाहिजे. डिझाइन व्यापक पातळीवरच डिझाइन केली जाते, असे नव्हे. एखाद्या वृद्धाला पाण्याच्या बाटलीचे झाकण काढण्यात अडथळा येत असेल तर त्यात त्यांच्या सोयीसाठी काही तरी उपाय शोधून काढला पाहिजे. खरे डिझाइन हेच असते. अशा प्रकारचे संशोधन करा, ज्यामुळे अभावग्रस्तांच्या आयुष्यात सुकरपणा येईल, अशीच डिझाइन करा, असाच सल्ला विद्यार्थ्यांना आपण देतो.