आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election 2014 News In Marathi, Barasat, Narendra Modi, Jadugar PC Sarkar

बारासातमध्ये मोदी मॅजिकच्या भरवशावर पीसी सरकार मैदानात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारासात- कोलकात्यातील उच्चभ्रू वस्तीतील सॉल्ट लेकमधील कॉलनींमध्ये भाजप उमेदवार प्रसिद्ध जादूगार पीसी सरकार ( ज्युनिअर) यांचा लवाजमा ना कोठे थांबत आहे, ना कुठे ते भाषण देतात. खुल्या गाडीत आपल्या जवळ थांबलेल्या कार्यकर्त्यांच्या कानात ते काहीतरी सांगतात आणि तत्काळ घोषणा होतात..दिल्लीमध्ये मोदी सरकार.. बारासातमध्ये पीसी सरकार. त्यानंतर संपूर्ण प्रचार मोदीमय. ना कोणताही दुसरा मुद्दा, ना विरोधी उमेदवारांचा काही नामोल्लेख होतो. दीड तासात आठ कॉलनींमध्ये प्रचार संपतोसुद्धा रोड शो सुरू होण्यापूर्वी सकाळी साडेसात वाजता पक्षाचे मंडल अध्यक्ष मनोज दास एकटेच हारफुलांची व्यवस्था करीत होते. त्यांनी जो हार घातलेला होता, तोच हार पीसी सरकार यांच्या गळ्यात शेवटपर्यंत कायम होता. मध्येच कोठेतरी कोणी स्वागत-सत्कार होत नाही. खरेतर पीसी सरकार यांच्यासाठी निवडणूक रिंगणात पहिले आव्हान भाजपचे कमकुवत असे नेटवर्क आहे. मनोज दास म्हणतात, हे खरे आहे की, आम्ही संघटनात्मक दृष्टीने मजबूत नाही आहोत, परंतु नरेंद्र मोदींच्या नावावर दुसरे लोक आमच्या बरोबर आलेले आहेत.

सरकार यांची लढत दोन डॉक्टरांशी आहे. एक आहेत, तृणमूल काँग्रेस उमेदवार व विद्यमान खासदार डॉ. कोकोली घोष दस्तीदार. ते अल्ट्रॉसाऊंड विशेषज्ञ आहेत. येथील सर्व सातही विधानसभा जागांवर तृणमूल काँग्रेसचा कब्जा आहे. डॉ. दस्तीदार सर्मथक यासच ताकद मानतात. ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे उमेदवार मुतरुजा हुसेनसुद्धा व्यवसायाने डॉक्टर आहेत. ते दोन वेळा आमदार आणि राज्य सरकारमध्ये मंत्रीही राहिलेले आहेत. हुसेन यांची प्रतिमा सेवाभावी डॉक्टरची आहे. बारासातमध्ये जवळपास 30 टक्के मुस्लिम मतदार आहेत.
7 जून 2013 रोजी बारासातच्या जवळील 20 वर्षीय कॉलेज विद्यार्थ्यांच्या सामूहित अत्याचारानंतर हत्या करण्यात आली होती. त्या विरोधात अनेक दिवस आंदोलने चालली. बीएसएनएलचे कर्मचारी पी. चक्रवर्ती म्हणतात, की, या घटनेला लोक अजून विसरलेले नाहीत. लोकांसाठी कायदा-सुव्यवस्था मुद्दा आहेच.
या वेळी जनता आपली जादू दाखवेल : सरकार
>जादू दाखवता दाखवता अचानक निवडणूक लढायचा विचार का केला?
एके दिवशी माझ्या अंतरंगातील ईश्वराने मला म्हटले की, इतका पैसा कमावतोस. याच लोकांनी तुला पीसी सरकार बनवलंय. हे लोक भ्रष्टाचार, गुन्ह्ेगारी, आणि अन्य समस्यांनी त्रस्त आहेत. यांची मदत न करशील तर काय? मग अचानक मन जागरूक झाले. पगडी उतरवली व पीसी सरकारचा प्रदीप सरकार बनलो.

>तुमचा प्रचार मोदींवर केंद्रित आहे, फक्त मोदी नावावरच भरोसा आहे?
जनता त्यांना पंतप्रधानाच्या रूपात बघू इच्छित आहे. पश्चिम बंगालपुरते बोलायचे तर येथील लोक दीड वर्षातच तृणमूल सरकारला वैतागलेले आहेत. या पक्षाचा खरा चेहरा आता समोर आला आहे. लोक मत देताना या दोन्ही गोष्टींना लक्षात ठेवणार आहेतच.

>तुम्ही तृणमूल व डाव्यांशी जवळ. मग निवडणूक भाजपकडून कशी ?
जेव्हा भाजपच्या लोकांना भेटलो तेव्हा मला असे वाटले की, यांच्या मागे एक महान व्यक्ती उभी आहे. ते आहेत, स्वामी विवेकानंद. त्यामुळे मी निश्चिंत होऊन येथे आलो आहे.