वाल्मीकीनगर/ कृषनगर- नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या वाल्मीकीनगर आणि पश्चिम बंगालच्या कृषनगरमध्ये सभा घेतल्या. बिहारच्या भूमीवर त्यांनी अमेठीवर निशाणा साधला. त्याच वेळी त्यांनी कृष्णनगरमधून ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
अमेठीच्या आडून राहुलवर टीका
ज्यांना सर्व देश आपला वाटत होता, त्यांना अमेठीत दारोदार फिरण्यास भाग पाडले जात आहे. जनता आपल्या खिशात आहे, असे ज्यांना वाटते त्यांचा अहंकार लोक जमिनीवर आपटतात. अमेठीच्या नागरिकांनी तुम्हाला गल्लोगल्ली फिरण्यास व मतदारांपुढे झुकण्यास भाग पाडले आहे.
ममता यांच्यावर निशाणा
दीदी! एवढा राग बरा नव्हे
>दीदींना आजकाल खूप राग येतो. दीदी एवढा राग कामाचा नाही. माझी बंगालच्या डॉक्टरांना विनंती आहे,की त्यांची काळजी घ्यावी. क्रोधामुळे प्रकृतीवर विपरीत परिणाम होतो.
>दीदी, देशाला आपणाकडून एका प्रश्नाचे उत्तर हवे आहे. तुम्ही सिंहीण आहात. माझ्या पश्चिम बंगालच्या मुलींवर इथे अत्याचार होण्याचे कारण काय आहे? इथे महिलांवर अत्याचार का होतात?
>दीदी कारण नसताना नाराज होतात. भाजप उमेदवाराला आणि तुम्हाला जिंकून देणारे बंगाली मतदारच आहेत. मग राग कशामुळे?
सोनियांवर टीका
मॅडम सोनियाजी, तुम्ही तर माझी खिल्ली उडवली
>मॅडम सोनियाजी, मोदी मागतात, असे तुम्ही म्हणाला होतात. पण मी म्हणालो होतो, दिल मांगे मोअर. ही जनता-जनार्दन माझ्यासाठी ईश्वरासमान आहे. जनतेला नाही मागणार तर कोणाला मागू? तुमच्या दरबारात येऊन मागायला मला लाज वाटली नसती. अभिमान वाटला असता. मागणे चांगले की लूट करणे चांगले, तुम्हीच सांगा. मोदी तर मागत आहे, लोकांना मागत आहे. लूट कधीपर्यंत होणार हे लुटणार्यांनी सांगावे.
>मॅडम सोनियाजी, आपण मोदींची खिल्ली उडवत होता. अमेठीच्या लोकांनीही तुमच्या मुलाला मागण्यासाठी भाग पाडले आहे. त्यांना गल्लोगल्ली फिरावे लागत आहे. लोकशाहीमध्ये जनताच सर्वकाही आहे. तुमचा अहंकार आता तुमचा बचाव करू शकत नाही.
बांगलादेशींनी बंगालला उद्ध्वस्त केले आहे,असे दीदींनी ऑगस्ट 2005 मध्ये लोकसभा अध्यक्षांसमोर सांगितले होते. मतांच्या राजकारणासाठी डावे पक्ष त्यांना भारतात आणत आहेत. तुम्ही 2005 मध्ये जे बोलला तेच आज मोदी म्हणत आहे. सर्वोच्च् न्यायालयानेही बांगलादेशींना परत जावे लागेल अशी टिप्पणी घुसखोरीविरुद्ध केली आहे.