आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफझलच्या गावात केवळ 11 मते; सोपोरमध्ये एकही मतदार फिरकला नाही!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला भागात बुधवारी (7 मे) सायंकाळी 4 वाजेपर्यंत 35 टक्के मतदान झाले. या ठिकाणी मतदान संथगतीने झाले. सोपोरमध्ये 11 केंद्रांवर दुपारी अडीचपर्यंत एकही मतदार फिरकला सुद्धा नाही. अफझल गुरूच्या गावात केवळ 11 जणांनी मतदान केले. पट्टन, संबल आणि हाजीनमध्येही मतदान केंद्रावर लोकांची कमी संख्या होती.
बुधवारी सात राज्यात 64 जागांसाठी मतदान झाले. यातील 31 जागांवर भाजपचे दिग्गजांवर अधिक फोकस दिसून आला. यूपी, उत्‍तराखंड, बिहार आणि हिमाचल प्रदेशात या जागा आहेत. 2009 मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले होते. तर कॉंग्रेसने 13 जागांवर वर्चस्व सिद्ध केले होते. देशात मोदींची लाट आहे की नाही, हे या 31 जागांच्या निकालांवरून ठरणार असल्याचे जाणकारांनी सांगितले आहे.

राज्यनिहाय मतदानाची टक्केवारी
बिहार - 58%
हिमाचल प्रदेश - 65%
सीमांध्र - 76.01%
उत्तराखंड- - 62 %
उत्तर प्रदेश - 55.52 %
पश्चिम बंगाल - 81.28%
जम्मू आणि कश्मीर - 49.98 %

रिंगणातील दिग्गज उमेदवार
>उत्तर प्रदेश : राहुल गांधी, स्मृती इराणी, कुमार विश्वास, वरुण गांधी, बेनीप्रसाद वर्मा, मोहंमद कैफ
>बिहार : रामविलास पासवान, राबडीदेवी, राजीव प्रताप रुडी
>हिमाचल : प्रतिभा सिंह, अनुराग ठाकूर

विविध राज्यांतील ताजी माहिती...
उत्तर प्रदेश

- उत्तर प्रदेशातील हा मतदानाचा पाचवा टप्पा असून १५ जागंसाठी मतदान होत आहे.
यात अमेठी, सुलतानपूर, प्रतापगड, कौशांबी, फूलपूर, अलाहाबाद, फैजाबाद, आंबेडकरनगर, बहराइच, केसरगंज, श्रावस्ती, गोंडा, बस्ती, संत कबीर नगर आणि भदोही यांचा समावेश आहे.
- या टप्प्यामध्ये राहुल गांधी, वरुण गांधी, स्मृती ईरानी, कुमार विश्वास, रेवती रमण सिंह, बेनी प्रसाद वर्मा, राजकुमारी रत्ना सिंह, किर्तीवर्धन सिंह, ब्रजभूषण शरणसिंह आणि निर्मल खत्री यांच्यासह 243 उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहेत.

बिहार
- बिहारमध्ये लोकसभेच्या सात जागांसाठी आणि विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे.
- लोकसभेच्या सात जागांसाठी येथे 118 उमेदवार रिंगणात आहेत.
- बिहारमध्ये ज्या मतदारसंघात मतदान सुरू आहे, त्यात शिवहर, सीतामढी, मुजफ्फरपूर, महाराजगंज, हाजीपूर, सारण, उजियारपूर यांचा समावेश आहे.

आंध्र प्रदेश
- जम्मालामाडुगू विधानसभा मतदारसंघात टीडीपी आणि वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता.
- आंध्र प्रदेशात लोकसभा निवडणुकीबरोबरच सीमांध्र परिसरात विधानसभेच्या 175 जागा
- नवीन राज्य निर्मीतीनंतर प्रथमच सीमांध्र परिसरात विधानसभा निवडणुका होत आहेत.
- येथे अरुकू, श्रीकाकुलम, विजयनगरम, विशाखापट्टनम, अनाकापल्ली, काकीनाडा, अमलापुरम, इलुरू, मछलीपट्टनम, विजयवाडा, गुंटूर, नरसारावपेट, बाप्पाटला, ओंगली, नांदयाल, कुरनूल, अनंतापूर, हिंदूपूर, कडप्पा, नेल्लोर, तिरुपति, राजमपेट आणि चित्तूर हे लोकसभा मतदारसंघ.

पश्चिम बंगाल
- पश्चिम बंगालच्या सहा जागांसाठी 72 उमेदवार मैदानात आहेत.
- येथील झारग्राम, मिदनीपूर, पुरुलिया, बांकुरा, विष्णुपूर आणि आसनसोल
- या टप्प्यात डाव्यांसमोर त्यांच्या सहा जागा टिकवण्याचे आव्हान आहे.
- या टप्प्यात प्रामुख्याने नऊ वेळा खासदार राहिलेले वासुदेव आचार्य, अभिनेत्री मुनमुन सेन, संध्या राय आणि गायक बाबुल सुप्रियो यांचे भवितव्य ठरणार आहे.

जम्मू-कश्मीर
- लद्दाख आणि बारामुल्ला या दोन जागा
- बारामुल्ला मतदारसंघात एका पोलिंगबूथच्या जवळ आईईडी ब्लास्ट झाल्याचे वृत्त आहे.

उत्तराखंड
- टिहरी गढवाल, पौढी गढवाल, अल्मोड़ा, नैनीताल, ऊधमसिंह नगर, हरिद्वार

हिमाचल प्रदेश
- सूबे की कांगडा, मंडी, हमीरपूर, शिमला

पुढील स्लाइड्‍स क्लिक करून पाहा, महिलांही मागे नाहीत...