आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाराणसीत मोदींच्या सभेस सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाही, जिल्हाधिकार्‍यांचा खुलासा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी - वाराणसी शहरातील बेनियाबाग या मध्यवस्तीत प्रचारसभा घेण्यास नरेंद्र मोदींना जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी नाकारली आहे. मोदींच्या सुरक्षेला धोका असल्याचा अहवाल गुप्तचर संस्था आयबीने दिला असल्याचे जिल्हाधिकारी प्रांजल यादव यांचे म्हणणे आहे. परंतु सभेला परवागनी नाकारल्याने भाजपचा तिळपापड झाला आहे. जिल्हाधिकारी खोटे बोलत असून आयबीने असा अहवालच पाठवलेला नाही. राजकीय कारणामुळे जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी नाकारल्याचा आरोप भाजप नेते अरुण जेटली यांनी केला. या निर्णयाविरोधात बनारस हिंदू विद्यापीठासमोर उद्या गुरुवारी जेटली व अमित शहा धरणे आंदोलन करणार आहेत.
नियोजित कार्यक्रमानुसार मोदी गुरुवारी बेनियाबाग येथे प्रचारसभा घेणार होते. त्यानंतर सायंकाळी गंगेच्या आरतीमध्येही सहभागी होणार होते. प्रशासनाने गंगा आरतीबद्दलही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यानंतर जेटली यांनी जिल्हाधिकार्‍यांची उचलबांगडी करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. दिवसभरात आपण मुख्य निवडणूक आयुक्तांना तीन पत्रे पाठवली, परंतु एकाचेही उत्तर आले नाही, असे जेटली यांनी सांगितले. मोदींच्या प्रचारसभेस परवानगी नाकारल्याने मोदींचे हेलिकॉप्टर विद्यापीठातील हेलिपॅडवर उतरेल. त्यानंतर ते शहर भाजप कार्यालयास भेट देणार आहेत. प्रशासनाने वाराणसीच्या ग्रामीण भागातील रोहनिया येथील सभेस परवानगी दिली आहे.

पुढील स्लाइडवर, भाजपचा युक्तिवाद