आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियंकांनी अमेठीत आप कार्यकर्त्यांसोबत मिळवला \'हात\', वाराणसीसाठी प्लॅन तयार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेठी/वाराणसी - प्रियंका गांधी-वढेरा सध्या अमेठीमध्ये बंधुराज राहुल यांचा प्रचार करीत आहेत. राहुल गांधी यांनी केलेल्या विकास कामांचा पाढा वाचणे आणि भाजप व नरेंद्र मोदींवर शरसंधान साधणे हे त्यांच्या प्रचारसभांचे वैशिष्ट्य आहे. आम आदमी पार्टीवर (आप) मात्र त्या फार बोलत नाहीत. अमेठीत राहुल गांधींविरोधात 'आप'च्या वतीने कुमार विश्वास लढत आहेत. विश्वास यांनी पहिल्या दिवसापासून राहुल यांच्याविरोधात रान उठवले आहे, तरीही प्रियंका 'आप'वर हल्ला करताना दिसत नाहीत. एवढेच नाही तर, प्रचारासाठी फिरत असताना रस्त्यात 'आप'चे कार्यकर्ते भेटल्यानंतर त्या त्यांच्यासोबत आनंदाने हस्तांदोलन करातानाही दिसत आहेत.
अमेठीमध्ये शुक्रवारी प्रचारादरम्यान, प्रियंका गांधी यांच्या समोर आपचे कार्यकर्ते आले, तेव्हा त्यांनी त्यांच्यासी हसत-हसत हस्तांदोलन करुन त्यांची चौकशी केली. स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते आणि लोकांना हे दृष्ट पाहून आश्चर्य वाटले.

पुढील स्लाइडमध्ये, वाराणसीसाठी तयार केला प्लॅन