आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारणात येण्याच्या प्रश्नावर प्रियंका म्हणाल्या, ‘सध्या नाही’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेठी- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची मुलगी प्रियंका गांधी-वढेरा यांनी राजकारण प्रवेशाची शक्यता फेटाळून लावली आहे. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणुकीत कोणाला स्पष्ट बहुमत मिळेल का, असा सवाल त्यांना करण्यात आला होता. त्यावर प्रियंका म्हणाल्या, एखाद्या पक्षाला बहुमत मिळेल, असे मला तरी वाटत नाही. तुम्ही राजकारणात याल, अशी आम्ही अपेक्षा ठेवावी काय ? त्यावर प्रियंका यांचे उत्तर- मी त्यावर भविष्यात विचार करेल, की नेमके काय करायचे. येथील लोक कोणत्याही पक्षाचे नाहीत. सर्वांचे माझ्या मनात स्थान आहे. परंतु ते कोणत्या ना कोणत्या कारणाने नाराज आहेत. त्यामुळेच त्यांच्याकडून सातत्याने निषेध केला जात आहे. त्यांना सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.

'सध्या माझा राजकारणात येण्याचा विचार नाही. माझी मुले छोटी आहेत. मला वाटते, मुले थोडी मोठी होईपर्यंत मी त्यांचे पालनपोषण करावे. कारण आम्ही लहानपणी आजी आणि वडिलांना गमावून वेदना सहन केल्या होत्या. म्हणूनच मी मुलांना आईचे भरपूर प्रेम देऊ इच्छिते.'