आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेठीत राजकीय खडाजंगी, प्रीती सहाय व स्मृती इराणीमध्ये जुंपली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेठी- काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींची अमेठी बुधवारी वेगळ्याच कारणांमुळे तापली. या जागेवरून निवडणूक लढणार्‍या भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी आणि राहुल गांधींची बहीण प्रियंका गांधींच्या खासगी सचिव प्रीती सहाय या दोघींमध्ये प्रचंड वादावादी झाली. जगदीशपूरमधील ठोरी गावातील एक मतदान केंद्रावर झालेला हा तमाशा दिवसभर चर्चेचा विषय ठरला.

जिल्हा प्रशासनाच्या नियमांनुसार, बाहेरील लोकांनी 5 मे रोजीच अमेठी सोडण्याचे आदेश असताना मतदानाच्या दिवशी प्रीती मतदान केंद्रावर काय करत होत्या, असा सवाल स्मृती इराणींनी केला. प्रीती सहाय यांनी प्रत्युत्तरादाखल सुरुवातीला आक्रमक पवित्रा घेतला, मात्र वाद वाढताना दिसल्यावर माघार घेतली. त्यांनंतरही स्मृती इराणींनी मतदान केंद्रावर उपस्थित पोलिस अधिकार्‍यांशी हुज्जत घातली.

जिल्हाधिकार्‍यांनी सहायना बाहेर काढले
>‘स्मृती इराणींनी आमच्याकडे तक्रार दाखल केली होती. प्रथमदर्शनी स्मृती आणि प्रीती सहाय या दोघी बूथवर उपस्थित राहणे अयोग्य आहे. सहाय बाहेरील व्यक्ती असल्यामुळे त्यांना तत्काळ जिल्ह्यातून बाहेर जाण्याचे आदेश देण्यात आले.’
- जगत राम, जिल्हाधिकारी, अमेठी

स्मृती : पाच तारखेनंतर तुम्ही इथे काय करत आहात? तुम्ही इथे असू नये.
प्रीती : तुम्ही उगाच वाद घालत आहात.
स्मृती : मॅडम, मी वाद घालत नाही. स्थानिक नागरिक नसताना तुम्ही मतदान केंद्रावर काय करत आहात?
प्रीती : तुम्ही मतदानावर प्रभाव पाडत आहात. तुमची गाडी इथे कशी आली?
स्मृती : काँग्रेसच्या महासचिवांचे घर 30 मीटर अंतरावर आहे. तुम्ही कशा आलात?
प्रीती : मी आता बाहेर जात आहे.
स्मृती : पण 5 मेनंतर तुम्ही इथे थांबल्याच कशा? बाहेरील व्यक्ती आहात, हे तुम्हीच
माध्यमांसमोर कबूल केले आहे. तुम्ही अधिकृत प्रमाणपत्र दाखवा.

प्रीती सहाय गेल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते स्मृती इराणी यांना म्हणाले, ते बळजबरी व लोकशाहीवर अत्याचार करत आहेत. यादरम्यान, स्मृती तिथे उपस्थिती पोलिस अधिकार्‍यांना म्हणाल्या, प्रीती सहाय यांच्याकडे अधिकार पत्र का मागितले नाही. त्या काँग्रेसला मदत करत असल्याचा आरोप ठेवला. यावर अधिकारी म्हणाला, मी माझे काम व्यवस्थित करत आहे. वेळ मिळेल तेव्हा त्यांना विचारेन.

राहुल तर भाषण देत होते
>स्मृती यांनी नंतर प्रसारमाध्यम प्रतिनिधींना सांगितले की, या केंद्रापासून 30 मीटर अंतरावर काँग्रेसच्या राज्य सरचिटणीसांचे घर आहे. हे नियमांचे उल्लंघन आहे. राहुल येथे आले आणि रांगेत जाऊन काँग्रेससाठी मत मागितले. सकाळी तर ते नीच राजकारणावर भाषण देत होते, तर मग त्यांचे हेच राजकारण आहे काय?

> 5 मेनंतर तुम्ही इथे काय करत आहात : स्मृती तुम्ही मतदानावर प्रभाव पाडत आहात : प्रीती