कुलू- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रविवारी हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या सभेत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी यांनी शहिदांचा अपमान केला आहे. मोदींनी ‘दिल मांगे मोअर’ असे म्हणत त्यांनी केवळ शहिदांचाच अपमान केला नाही, तर त्यांचे मन फक्त खुर्ची मागू लागल्याचेही सिद्ध झाले आहे.
त्यांच्या गप्पा जणू सिंहासनावर बसल्यासारख्याच
भाजपचे मुख्य कॅम्पेनर नरेंद्र मोदी यांच्या गप्पा ऐकल्यानंतर निवडणुकीचा निकाल आला आहे आणि ते सिंहासनावर विराजमान झाले आहेत, असे वाटते; परंतु निवडणुकीचा निकाल ते नव्हे, जनताच ठरवणार आहे, याचेच विस्मरण मोदींना झाले आहे. जनता काँग्रेसचा मार्ग निवडेल, असा विश्वास मला आहे.
भाजप नेते (मोदी) देशाला रात्रीतून स्वर्ग बनवण्याचे स्वप्न पाहतात; परंतु असे कधीच होऊ शकत नाही. देशाला स्वर्ग बनवण्यासाठी कित्येक वर्षे निघून जातात. देश भाजपच्या हाती गेला तर देशभरात अशांतता माजेल.
छायाचित्र - रुरकीमध्ये सोनिया यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांच्यासह सभा घेतली.