आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाव्यांची गुगली : ममतांशी हातमिळवणीस डावे पक्ष तयार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता- नरेंद्र मोदींच्या विरोधात दोन कट्टर विरोधकही एकत्र येण्यास तयार झाले आहेत. केंद्रामध्ये बिगर काँग्रेसी आणि बिगर भाजप सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही तृणमूल काँग्रेसचाही पाठिंबा घेऊ शकतो, असे भाकपचे माजी सरचिटणीस ए. बी. वर्धन यांनी म्हटले आहे. ममता बॅनर्जी आणि मोदी यांच्या चांगलेच वाकयुद्ध पेटले होते, हे विशेष!
ममतांचीही हीच इच्छा : वर्धन
वर्धन म्हणाले की, मोदींना सत्तेपासून दूर ठेवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी यांचीही तिच इच्छा आहे. अशा परिस्थितीत निवडणूक निकालानंतर सरकार स्थापनेच्या प्रक्रियेत त्या आमचा मित्र पक्ष बनू शकतात. पुढील लोकसभा निवडणुकीत डाव्या पक्षांची शक्ती आणखी कमी होऊ शकते, असेही त्यांनी मान्य केले.
मोदींचा भाजपवर कब्जा
वर्धन म्हणाले की, ते (मोदी) प्रचंड जातीयवादी व्यक्ती आहेत. एकट्या माणसाने संपूर्ण पक्षावरच कब्जा केला आहे. जेव्हा मोदी बोलतात तेव्हा जणू एखादा पंतप्रधानच बोलतो, असे वाटू लागते. ते कधी केंद्रात मंत्रीही झाले नाहीत मात्र त्यांची देहबोली ते पंतप्रधान झाल्यासारखीच आहे. काँग्रेसला यावेळी 80 जागा मिळाल्या तरी खूप झाले.