आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मतदारांना पैसे वाटताना काँग्रेस उमेदवारास पकडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई - नगर परिषद निवडणूक प्रचारात मतदारांना पैसे वाटताना मनसेच्या उमेदवाराने काँग्रेस उमेदवार गणेश मसने यांना पोलिसांना पकडून दिले.त्यांच्याकडून पोलिसांनी ६९ हजार ५०० रुपये जप्त केले.
प्रचार अंतिम टप्प्यात असून सर्वच उमेदवारांचा गाठीभेटींवर भर आहे. प्रभाग क्रमांक ३ चे काँग्रेसचे उमेदवार गणेश मसने यांच्याविरुद्ध मनसेचे उमेश पोखरकर रिंगणात आहेत. मसने मतदारांना पैसे वाटप करत असल्याची माहिती पोखरकर यांना कळताच त्यांनी मसने यांना रंगेहाथ पकडले. पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मसने यांची झडती घेतली तेव्हा ६९ हजार ५०० रुपयांची रोकड सापडली.
मतदार यादीही जप्त
मसने यांच्याजवळ एक मतदार यादी सापडली. त्यात मतदारांच्या नावासमोर पैशाचे आकडे लिहिलेले असल्याने संशय अधिकच बळावला. या प्रकरणी पोखरकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून मसने यांच्यावरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खिशात पैसे टाकले
प्रचार करत असताना आमच्या विरोधात उभ्या उमेदवारांनी मला धक्काबुक्की केली. त्यानंतर त्यांनी हे पैसे माझ्या खिशात टाकले, असे आरोपी काँग्रेस उमेदवार गणेश मसने यांचे म्हणणे आहे.
बातम्या आणखी आहेत...