आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Live Delhi Assembly Election Results 2015 | Delhi Election Result 2015 In Marathi| Delhi Election Result In Marathi| Election Results 2015

Delhi Election Results 2015: \'ईव्हीएम\'मधील मते अशा पद्धतीने मोजली जातात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: मतमोजणी टेबलवर ठेवलेले ईव्हीएम आणि मतमोजणी करणारे कर्मचारी)

नवी दिल्ली- दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये (ईव्हीएम) कैद झालेल्या मताच्या मोजणीनंतर राजधानी कोणाची? हे ठरणार आहे. मात्र, ईव्हीएम काय आहे? ईव्हीएममधील मतांची मोजणी कशा पद्धतीने होते. याबाबत कदाचित काही लोकांना माहीत नसेल. यामुळे ईव्हीएम काय? मतमोजणी कशी होते, याबाबत आम्ही वाचकांना माहिती देणार आहोत.

सगळ्यात आधी पोस्टाने आलेल्या मतांची मोजणी होते....
मतदानानंतर सर्व ईव्हीएम केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांच्या सुरक्षिततेत ठेवण्यात येतात. विधानसभेचा प्रत्येक मतदार क्षेत्रासाठी स्वतंत्र टेबल निश्चित केले जातात. सुरुवातीला पोस्टाने आलेली मते मोजली जातात. अर्ध्या तासानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी केली जाते. मशिनी सुरक्षित खोलीतून बॅरिकेटेड परिसरात आणल्या जातात.

एकाच वेळी 14 ईव्हीएममधील मताची मोजणी...
एकाच वेळी जास्तीत जास्त 14 ईव्हीएममधील मतांची मोजणी केली जाते. यासाठी काउंटिंग भागात 14 टेबल लावले जातात. प्रत्येक काउंटिंग टेबलवर एक सरकारी (इलेक्शन) अधिकारी आणि निवडणूक लढवत असलेल्या उमेदवाराचा एक प्रतिनिधी उपस्थित असतो. निवडणूक अधिकारी आणि उमेदवाराचा प्रतिनिधीमध्ये तारांचे पार्टीशन असते. ईव्हीएमपर्यंत राजकीय प्रतिनिधी पोहोचणार नाही, हा या मागील उद्देश असतो. मतमोजणी करणारे अधिकारी सगळ्यात आधी ईव्हीएमवरील कागदी सीलची तपासणी करतात.

सीलची तपासणी केल्यानंतर मशीन 'ऑन' केले जाते...
ईव्हीएमच्या सीलची तपासणी केल्यानंतर ते 'ऑन' केले जाते. नंतर 'रिझल्ट' हे बटन दाबले जाते. काही क्षणातच उमेदवार आणि त्याला मिळालेली मते डिस्प्ले होतात. ही सर्व माहिती 'फॉर्म 17 सी'वर भरली जाते. फॉर्म 17सीवर उमेदवाराच्या प्रतिनिधीची स्वाक्षरी घेण्यात आल्यानंतर तो पीठासीन अधिकार्‍याकडे सुपूर्द केला जातो.

अन्य 13 टेबलवरल 'फॉर्म 17सी' देखील अशाच पद्धतीने पीठासन अधिकार्‍याकडे पाठवले जातात. पीठासन अधिकारी सर्व उमेदवारांना मिळालेल्या मतांची बेरीज करतात. नंतर निकाल ब्लॅक-व्हाइट बोर्डावर जाहीर केला जातो.

प्रत्येक फेरीतील निकालाची माहिती राज्य निवडणूक आयुक्ताला दिली जाते.
ईव्हीएमच्या मताची मोजणी केल्यानंतर शेवटच्या फेरीतील निकाल जाहीर केले जातात. प्रत्येक फेरीत जाहीर झालेले निकाल राज्य निवडणूक आयुक्ताला पाठवले जातात.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, कसे काम करते ईव्हीएम? आणि पूर्वीची व्यवस्था...