फुलपूर - उंच कॉलर आणि हलक्या क्रिम रंगाचा शर्ट आणि पातळ बॉटम असलेला पायजमा घालणारे मोहंमद कैफ घरगुती साधे पुरुष वाटतात. ते क्रिकेटर किंवा नेता या प्रतिमेपासून खूप लांब वाटतात. तरी देखील राहुल गांधी यांनी त्यांना फुलपूर येथून निवडणूक लढवण्याचा आग्रह केला होता. येथून राहुलचे पणजोबा जवाहरलाल नेहरू निवडणूक लढवत असत. भाषणांमध्ये कैफ परंपरागत नेत्यासारखे बोलतात. विकासाचे मुद्दे, बेरोजगारीची समस्या, धार्मिक वातावरण, युवकांचे प्रश्न यावर ते बोलतात. पण नेत्यापेक्षा त्यांची क्रिकेटर हीच प्रतिमा दिसून येते. सर्वसामान्यत: नेत्याचा व्यायाम, जीम हा दैनंदिनीचा भाग नसतो.
राहुल आपल्याला मॉलमध्ये भेटले आणि तेथेच निवडणूक लढण्याची संधी दिली का? यावर कैफ म्हणतात, ते पहिल्यांदा कराची येथे भेटले होते. त्या वेळी भारत-पाकिस्तान या देशांमध्ये क्रिकेट सामन्यांना पुन्हा सुरुवात होत होती. त्यांनी माझ्याशी चर्चा केली पण यात निवडणुकी विषयी कुठलीच चर्चा आमच्यात झाली नाही. माझ्याशी निवडणुकी विषयीची चर्चा स्थानिक आणि केंद्रीय नेत्यांनी केली आणि मी त्यांना होकार दिला. त्यानंतर राहुल मला प्रोमोनेड मॉलमध्ये भेटले. आम्ही सोबत कॉपी घेतली. मात्र, प्रसार माध्यमांनी चुकीच्या पद्धतीने ते दाखवले. समजा, त्यांनी अचानक निवडणूक लढण्यास सांगितले. युवक, मुलेही नाहीतर महिला आणि वयोवद्ध यांच्यातही कैफची मागणी एकसारखी होती. परंतु जातीच्या गणितानुसार त्यांचा सल्ला सोपा नाही. गांधीवादी विचारक रामा धीरजसिंह म्हणाले, एकवेळ अशी होती की जनता फुलपूरहून जाताना येताना घाबरत असे; कारण बैरगिया नाल्याजवळ लुटारूंचे वास्तव्य होते. या नाल्याजवळ काशी-प्रयागला जाणा-या प्रवाशांना लुटत. 1831मध्ये विल्लियम हेन्री स्लिमनने लुटारूंचा अंत केला. परंतु, लुटारूंनी वेशांतर केले असून ते पांढरेपेशे झाले आहेत. त्यामुळे आज देशाला परत एका स्लिमनची गरज आहे.
पटेल समाजाची मते ठरवतात निर्णायक
कैफच्या विरुद्ध बसपाचे कपिल मुनी, सपाचे धर्मराज पटेल आणि भाजपचे केशव प्रसाद मौर्य रिंगणात आहेत. कपिल वाळू माफिया आहेत. ते गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहेत. त्यांचा भाऊ उदय भान देखील कारागृहात आहे. धर्मराज पटेल यांना स्वजातीच्या मतांचा फायदा होईल. 12 टक्के पटेल मतदारांमुळे सन 1984 ते 2000पर्यंत येथे पटेलच खासदार होता. या वेळी अनुप्रिया पटेल यांचा भाजपशी समजोता झाल्याने पटेल समाज भाजपकडे वळेल.