आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prakash Karat News In Marathi, Communist Party Of India, Divya Marathi

देशात मोदींची लाट नाही, ती भाजपकडून पसरवण्‍यात येत आहे - प्रकाश करात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशात कॉँग्रेसविरोधी वातावरण तापले आहे. तर दुसरीकडे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची लाट असल्याचे चित्र निर्माण करण्यात येत आहे. मात्र, मोदींची कोठेही लाट नसून भाजपकडून याची हवा पसरवण्यात येत असल्याची प्रतिक्रिया मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे महासचिव प्रकाश करात यांनी दिली.
पत्रकारांशी बोलताना करात म्हणाले, भाजपच्या निवडणूक अभियानात राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी भूमिका आहे. भाजपचा प्रचार हा धर्मावर आधारित असून त्यांना सुशासन आणि देशाचा विकास याबाबत काहीही देणे-घेणे नाही. मोदी पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशींच्या विरोधात बोलले. बिहारमध्ये त्यांनी गुलाबी क्रांतीचा मुद्दा छेडला. प्रत्येक राज्यात त्यांचे मत बदलत गेले आहे. मोदींचे भाषण हे वास्तविकतेपासून दूर असल्याची टीका करात यांनी केली.