आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई-भावावरच्या \'गंदी बात\'वर भडकल्या प्रियंका, म्हणाल्या- घाबरटांसारखे पत्रके फेकू नका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठीत प्रचार करीत असलेल्या प्रियंका गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढविला असून भाजपचे नेते घाबरट असल्याचा आरोप केला आहे. प्रियंका म्हणाल्या आहेत, की सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासंदर्भात अमेठीच्या नागरिकांच्या दारांवर अवमानकारक पत्रके टाकली जात आहेत.
अमेठी आणि या मतदारसंघाच्या जवळपास असलेल्या गावांमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर चिखलफेक करणारी पत्रके लोकांच्या दारात टाकली जात आहेत. त्यात दोघांबद्दल अतिशय खालच्या भाषेचा वापर करण्यात आला आहे. त्यावर भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांचे नाव आहे.
यासंदर्भात प्रियंका यांनी भाजपच्या नेत्यांवर हल्ला चढविला आहे. त्या म्हणाल्या, की ते लोग मध्यरात्री लोकांच्या दारांवर अशी पत्रके टाकत आहेत. जर असे करायचे आहे तर खुलेआम करा. ही विचारांची लढाई आहे. जर तुम्हाला काही म्हणायचे असेल तर खुलेपणाने म्हणा. घबरटांसारखे असे का करीत आहात? तुम्हाला माहित आहे, कोण खोटे बोलत आहे आणि कोण नाटक करीत आहे. आम्ही अशा दुष्प्रचारासमोर झुकणार नाही.
पुढील स्लाईडवर बघा, प्रियंका गांधी यांची प्रचारादरम्याची छायाचित्रे.....