आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Gandhi News In Marathi, Congress, Rahul Gandhi, Lok Sabha Election

ते भित्रे आहेत, समोर का येत नाहीत?,राहुलविरोधातील पुस्तकामुळे भडकल्या प्रियंका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेठी - प्रियंका गांधी यांनी शुक्रवारी आक्षेपार्ह पुस्तकांचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी गौरीगंज विधानसभा क्षेत्रातील शाहगढ भागात शहीद चौकात सभा घेतली. त्यात आरोप केला की, काही भित्रे लोक गांधी परिवाराविरोधात मजकूर असलेली पुस्तके फेकतात. ‘राहुलची रावणीलीला’ या पुस्तकात सोनिया गांधी, राहुल आणि परिवाराबाबत अश्लिल टिप्पणी करण्यात आलेली आहे. हे पुस्तक नवी दिल्लीतील संस्कृतिरक्षक दलाने छापले आहे.

मला माहिती देण्यात आली की, जेथे माझ्या प्रचारसभा असतात, तेथे सभेपूर्वी मध्यरात्री माझ्या परिवाराबद्दल चुकीचा मजकूर असलेली पुस्तके फेकली जातात. त्यात घाणेरडा आणि खोटा मजकूर असतो. अशी कृत्ये करणारे खूपच भित्रे आहेत. त्यांना कही म्हणायचे असेल, तर तोंडावर सांगावे. ते माझ्यासमोर येऊन का बोलत नाहीत.

देशातील प्रचाराची पातळी घसरली
देशात निवडणुकीच्या प्रचाराची पातळी खूपच घसरलेली आहे. राजकारणाकडे सेवाक्षेत्र म्हणून पाहिले जाते. मात्र, देशातील काही नेते त्याबाबत तसा विचार करत नाहीत. राहुलजींचे राजकारण मागणी करणारे नाही, तर सेवाभावनेचे आहे. ते आपल्याला ताकद आणि सत्ताही देऊ इच्छितात.
देशात एक असे नेते आहेत, ज्यांना स्वत:ला सत्ता हवी आहे. ते मागणी करतात आम्हाला ताकदवान बनवा, आम्ही सर्व ठीक करू. अशा रीतीने मी मते कधीही मागणार नाही.