आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yashwant Sinha Attacks Chidambaram News In Marathi

...तर चिदंबरम यांना पूर्नजन्म घ्यावा लागेल, नि‍ष्क्रिय अर्थमंत्र्याच्या आरोपावर सिन्हांचा पलटवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार असताना मी केलेल्या कामापर्यंत पोहोचण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना पूर्नजन्म घ्यावा लागेल, असा सनसनाटी पलटवार माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केला आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीने 'कर दहशतवाद' पसरवला, असेही ते म्हणाले. सिन्हा आतापर्यंत सर्वांत खराब अर्थमंत्री राहिले आहेत, असा आरोप चिदंबरम यांनी केला होता. त्यावर सिन्हा यांनी पलटवार केला आहे.
यासंदर्भात यशवंत सिन्हा म्हणाले, की कर प्रणाली अधिक सुलभ करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहणार आहोत. राज्य सरकारांसोबत समन्वय राखत डायरेक्ट टॅक्स कोड आणि जीएसटी घटना दुरुस्ती विधेयक आणल्यास कर प्रणाली अधिक अनुकूल होईल. यामुळे केंद्र सरकारच्या उत्पन्नातही वाढ होईल. 1991 आणि 1998 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था अडचणीत सापडली होती. त्यापेक्षाही मोठे संकट चिदंबरम यांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर आणले आहे.
यशवंत सिन्हा म्हणाले, की नवीन सरकार सत्तेत आल्यावर अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीवर नियंत्रण मिळविणे हे मोठे आव्हान राहणार आहे. वित्तिय तुट 4.6 टक्के ठेऊन चिदंबरम यांनी देशासमोर खरे चित्र मांडले नाही. त्यांनी देशात कर दहशतवाद पसरवला.