आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्वॉईंट कमिश्नरची नोकरी सोडून सुनीता दुग्गल राजकारणात, रतियामधून निवडणुकीच्या रिंगणात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: भाजपच्या उमेदवार सुनीता दुग्गल)

हिसार- हरियाणातील यंदाची विधानसभा निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. कारण एका महिलेने सरकारी नोकरी सोडून राजकारणात प्रवेश केला आहे. सुनीता दुग्गल असे या महिला उमेदवाराचे नाव असून भाजपने त्यांना उमेदवारी दिली आहे.

प्राप्तकर विभागात सहआयुक्त (ज्वाइंट कमिश्नर) सुनीता दुग्गल यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. दुग्गल सरकारी नोकरी सांभाळून समाजकार्यात संक्रीय होत्या. नंतर त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन सक्रीय राजकारणात प्रवेश केला.

गेल्या महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या ‍रिंगणात उतरण्यासाठी सुनीता दुग्गल यांनी नोकरी सोडली होती. परंतु, दुग्गल यांना उमेदवारी मिळाली नाही. मात्र, विधानसभा निवडणुकीत सुनीता दुग्गल यांना भाजपने दिली आहे. रतिया विधानसभा मतदार क्षेत्रातून सुनीता दुग्गल निवडणूक रिंगणात आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी दुग्गल भजन-कीर्तन करताना दिसत आहे.
पुढील स्लाइड्‍वर वाचा, महिला उमेदवार सुनीता दुग्गल यांचे छायाचित्रे...