आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO हरियाणा निवडणुकीत ग्लॅमरचा तडका, रवीना आणि सनीने केला प्रचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - महम येथे रोड शोमध्ये सहभागी झालेली अभिनेत्री रवीना टंडन.

रोहतक - महममध्ये अभिनेत्री रवीना टंडनने हरियाणा लोकहित पार्टी आणि हरियाणा जनहित काँग्रेस आघाडीचा पाठिंबा असणारे उमेदवार सौरभ फरमाना यांच्या प्रचारासाठी आयोजित रोड शोमध्ये सहभाग घेतला. लोकसभा निवडणुकीतही रवीनाने कुरुक्षेत्रमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार केला होता.

सनी देओल बहलमध्ये
लोहारूमधून भाजपचे उमेदवार असणारे जेपी दलाल यांच्या प्रचारसभेत पोहोचलेले अभिनेते सनी देओल यांचे रविवारी जोरदार स्वागत झाले. सनीने स्टेजवर पोहोचताच हात उंचावून सर्वांचे आभार मानले. सनी देओल म्हणाले, भाजप माझे कुटुंब आहे. त्यांनी जेपी दलाल हे आपले सहकारी असल्याचे सांगत त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी जनरल व्ही के सिंह यांचीही उपस्थिती होती.

पुढील स्लाइड्सवर पाहा, रवीना आणि सनी यांचे PHOTO