आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'फिजा\'च्या प्रेमात चंद्रमोहनचा \'चांद\' झालेल्या या नेत्याला भोगावा लागलाय राजकीय वनवास!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- फिजा संग चंद्रमोहन बिश्नोई)

हिसार- अनुराधा बाली ऊर्फ फिजा हिच्या प्रेमात 'चांद' झालेले हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री चंद्रमोहन बिश्नोई पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. चंद्रमोहन हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचे ‍पुत्र असून ते पाचवेळा आमदार राहिलेले आहेत. हुडा सरकारमध्ये चंद्रमोहन यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले होते.

चंद्रमोहन यंदा त्यांचे बंधु कुलदीप बिश्नोई यांच्या हरियाणा जनहित कॉंग्रेस पक्षाच्या तिकिटावर नलवा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. चंद्रमोहन यांच्याकडे केवळ 16 लाख रुपये संपत्ती असल्याचा उल्लेख त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. दुसरीकडे, चंद्रमोहन यांची पत्नी सीमा बिश्नोई यांच्याकडे सुमारे 61 कोटी रुपयांची संपत्ती आहे. याचा अर्थ असा की चंद्रमोहन यांच्यापेक्षा त्यांची पत्नी श्रीमंत आहे.

चंद्रमोहन यांनी निवडणूक अर्ज भरताना त्यांच्याकडे असलेल्या एकूण संपत्तीचा 16 लाख 27 हजार 170 रुपये सांगितली आहे. त्यात 100 ग्रॅम दागिने, 13 लाख रुपये रोख रकमेचा समावेश आहे. मात्र, चंद्रमोहन यांच्या प्रतिज्ञापत्रात कोणत्याही स्थावर मालमत्तेचा उल्लेख केलेला नाही.
चंद्रमोहन यांची पत्नी सीमा यांच्याकडे 73 लाख 31 हजार 756 रुपयांची स्थावर मालमत्ता आणि 60 कोटी रुपयांची जंगम मालमत्तेचा समावेश आहे.

भूतकाळ विसरण्याचा प्रयत्न करत आहेत चंद्रमोहन...
राजकारणात भूतकाळाचे भूत कधी मानगुटीवर येऊन बसेल हे सांगता येत नाही. आणि तेच चंद्रमोहन यांच्याबाबत घडले आहे. चंद्रमोहन आपला भूतकाळ विसरण्याचा खूप प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांचे विरोधक त्यांना तो विसरु देत नसल्याचे दिसत आहेत. हुडा सरकारामध्ये उपमुख्यमंत्रीपद म‍िळाल्याने चंद्रमोहन यांना खूप प्रतिष्ठा मिळाली. परंतु अनुराधा बाली उर्फ फिजा हिच्या प्रेमप्रसंग नंतर धर्म बदलून निकाह केल्याप्रकरणी चंद्रमोहन यांना खुर्ची गमवावी लागली होती. नंतर चंद्रमोहन यांना राजकीय वनवासही भोगावा लागला होता. चंद्रमोहन यांनी कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन हरियाणा जनहित पक्षाच्या तिकिटावर नलवा येथून निवडणूक रिंगणात उतरले आहे. विरोधक चंद्रमोहन यांच्यावर टीका करण्‍याची एकही संधी गमावताना दिसत नाही.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, चंद्रमोहन आणि फिजाची काही छायाचित्रे...