आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Haryana CM Hooda Will Today Nomination News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा आज भरणार उमेदवारी अर्ज, गुढी सांपला येथून लढणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहतक- हरियाणाचे मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा आज (शुक्रवार) सकाळी उमेदवारी अर्ज भरणार आहे. नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील बसपचे उमेदवार डॉ.अशोक कुमार यांच्यासह पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा हे गढी सांपला-किलोई येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. आमदार भारत भूषण बत्रा हे रोहतक शहर, आनंद सिंह दांगी हे महम तर शकुंतला खटक कलानौर मतदार संघातून शुक्रवारी मुख्यमंत्री हुड्डा यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरतील.

मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा हे सकाळी महम येथे पोहोचून प्रचारसभेत संबोधित करतील. नंतर हुड्डा यांच्या उपस्थितीत आमदार आनंद सिंह दांगी हे उमेदवारी अर्ज दाखल करतील.

हुड्डा हे काही वेळ डॉ.आंबेडकर चौकात असलेल्या पक्षाच्या कार्यालयात पदाधिकार‍ी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जावून गढी सांपला मतदार संघातून स्वत:चा उमेदवारी अर्ज दाखल करतील. एसडीएम कार्यालयात रोहतक शहर मतदार संघातील उमेदवार भारत भूषण बत्रा आणि सेक्टर तीन मधील हुडा प्रशासक कार्यालयात कलानोरच्या उमेदवार शकुंतला खटक हे अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी हुड्डा उपस्थिती देतील. .

बसपचे अशोक कुमारसह पाच उमेदवारांनी दाखल केला अर्ज...
घटस्थापनेच्या दिवशी कलानोर येथून बसपचे उमेदवार अशोक कुमार व अपक्ष उमेदवार सत्यवीर सिंह यांनी अर्ज भरला. दुसरीकडे रोहतकमधून समस्त भारतीय पक्षाचे उमेदवार नितिन बंसल, महम विस क्षेत्रातून दलीप सिंह आणि काश्मीर सिंह यांनी उमेदवारी अर्ज भरला.

जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अमित कुमार यांनी सांगितले की, अर्ज दाखल करण्‍याची अंतिम तारीख 27 सप्टेंबर (शनिवार) आहे. आतापर्यंत एकूण सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. 29 सप्टेंबरला उमेदवारी अर्जाची छाननी होईल. त्यानंतर एक ऑक्टोबर ही माघार घेण्याची तारीख आहे.

बिजेंद्र शर्मा गढी सांपला येथून लढणार निवडणूक
कुलदीप शर्मा यांच्या हरियाणा जनहित पक्षाच्या तिकिटावर युवा नेते बिजेंद्र शर्मा हे गढी सांपला-किलोई मतदार संघातून निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री हुड्डा आणि बिजेंद्र शर्मा हे आमने सामने उभे ठाकतील.

दुसरीकडे, कलानौर येथील आरक्षित जागासाठी पक्षाने प्रमोद सिंहपुरिया यांना उमेदवारी मिळाली आहे. महम येथून विनोद शर्मा हे जनचेतना पक्षातर्फे निवडणूक लढण्याची शक्यता आहे.