आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'बायको द्या, मत घ्या\', उपवरांची अजब मागणी, खाप पंचायतींनी दिला पाठिंबा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंडीगड- हरियाणा होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांसमोर एक मोठे आव्हान उभे ठाकले आहे. ते म्हणजे, राज्यातील उपवरांच्या विवाहाचा प्रश्न. 'बायको द्या, मत घ्या', असा अजब प्रस्ताव राज्यातील उपवर मतदारांनी उमेदवारांसमोर ठेवला आहे. उपवरांच्या या प्रस्तावाला खाप पंचायतींनीही पाठिंबा दिला आहे.

जे उमेदवार बायको मिळवून देतील, अशा उमेदवारांना मतदान करणार असल्याचा निर्धार जिंद जिल्ह्यांतील उपवरांनी केला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीतही अशाच प्रकारचा मागणी उपवरांनी केली होती. जिंद जिल्ह्यातील उपवरांनी 'जिंद कुंवारा युनियन'ची स्थापना केली आहे.

दरम्यान, देशात हरियाणामध्ये स्त्री-पुरुष जन्मदरात सर्वाधिक तफावत आहे. त्यामुळे उपवर तरुणांना मुली मिळणे जिकिरीचे झाले आहे. 2011च्या जनगणनेप्रमाणे हरियाणात 1000 पुरुषांमागे 879 स्त्रिया आहेत.

भाजपचे नेते धनकर यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी वादग्रस्त विधान केले होते. देशातील उपवरांसाठी बिहारमधून बायका आणून देणार असल्याचे धनकर यांनी आश्वासन दिले होते.

एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, 'जिंद कुंवारा युनियन'चे प्रदीप सिंह हे म्हणाले, जिल्ह्यात बहुतांश तरुणांचा विवाह व्हायचा आहे. अविवाहित तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गरीब, मध्यम आणि श्रीमंत कुटूंबांमधील तरुणांची समस्या सारखीच आहे. जिंद जिल्ह्यात विवाह संस्था आहेत. परंतु त्या उपवरांकडून मोठी रकम वसूल करत असल्याचा आरोपही कुंवारा युनियनने केला आहे.
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, कॉंग्रेसने दिली आनंद कौशिक यांना दिली उमेदवारी...