आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Haryana Polls, Notice To Candidates For Code Violations By Election Commission, News In Marathi,

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आचार संहिताचे उल्लंघन केल्याने कॉंग्रेससह भाजपच्या उमेदवारांना नोटिस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाला सिटी- निवडणुकीच्या काळात आदर्श आचार संहिता का उल्लंघन केल्याप्रकरणी हरियाणा जनचेतना पक्षा, इंडियन नॅशनल लोकदल, भाजप आणि कॉंग्रेसच्या उमेदवारांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.प्रियांका सोनी यांनी उमेदवारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दोन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
नोटिशीला उत्तरे न दिल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे डॉ. प्रियांका सोनी यांनी सांगितले आहे. वरील सर्व पक्षाच्या उमेदवारांनी प्रशासनद्वारा प्रतिबंदी घालून देण्यात आलेल्या भागात पक्षाची जाहिरात आणि पोस्टर लावल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

...तर एफआयआरही दाखल होणार?
आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस बजावलेल्या उमेदवारांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल होवू शकते. भादंविनुसार 425, 426, 427 आणि 433 नुसार तसेच हरियाणा प्रिव्हेंशन ऑफ डिपॅसमेंट प्रॉपर्टी अॅक्ट कलम 133 आणि महापालिका कायद्यानुसार कायदेशीर कारवाईची तरतूद आहे. एवढेच नव्हे तर संबंधीत उमेदवारांनी आदेशाचे पालन न केल्यास त्यांना कारावासाची शिक्षाही होऊ शकते.

प्रतिबंधित करण्‍यात आलेली ठिकाणे..
अग्रसेन चौक ते बाल भवन, जगाधरी गेट ते चड्ढा पॅलेस, मिक्सी चौक परिसर चर्च कम्पाउंड, मानव चौक बस क्यू सेंटर ते हुड्डा सेक्टर 8, आर्य चौक आणि पॉलिटेक्निक चौकात निवडणूक काळात पक्षाची जाहिरात तसेच पोस्टर लावण्यास निर्बंध घालण्यात आले आहे.