आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचा चौटालांवर निशाणा; जनतेला म्हणाले, काम करण्यासाठी चंदीगड सोयीचे की तिहार?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्नाल - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणा विधानसभा निवडणूक प्रचाराला आजपासून (शनिवार) सुरवात केली आहे. कर्नालमधील प्रचारसभेत ते म्हणाले, 'दानवीर कर्ण'ची ही भुमी आहे. येथून निवडणूक प्रचाराला मी सुरवात करत आहे. हरियाणात आल्यानंतर मला माझ्या घरी आल्यासारखे वाटते, असे सांगत त्यांनी आपलेपणाचे नाते जनतेशी जोडले.
काँग्रेसवर हल्लाबोल करताना मोदी म्हणाले,'जे गेल्या साठ वर्षांमध्ये काही करु शकले नाही, ते मला 60 दिवसांचा हिशोब मागत आहेत.' भाजपलला पूर्ण बहुमत देण्याची मागणी करत मोदी म्हणाले, 'तुम्हाला विकास हवा असेल तर भाजपला पूर्ण बहुमत द्या. काँग्रेस मुक्त हरियाणा करा.' हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांच्यावर त्यांनी जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, 'ज्यांना आधी आजमावले आहे त्यांची पुन्हा ट्रायल घेऊ नका. मला सांगा तुमचे एखादे काम अडले आहे, ते करण्यासाठी चंदीगडला जाणे सोयीचे आहे, की तिहारमध्ये.' जेबीटी घोटाळ्यात चौटालांना शिक्षा झाली आहे. मात्र, सध्या ते सशर्त जामीनावर बाहेर आहेत.
मोदी म्हणाले, जगात आमची प्रतिष्ठा वाढली
नुकतेच अमेरिका दौर्‍यावरुन आलेले पंतप्रधान मोदी म्हणाले, भारत आणि भारतीयांची प्रतिष्ठा जगाच्या पाठीवर वाढली आहे. ती माझ्यामुळे नाही, तर तुमच्या विश्वासामुळे वाढली आहे. देशामध्ये मजबुत सरकार आहे, त्यामुळे देशाला प्रतिष्ठा मिळाली आहे. चीन, जपान, अमेरिका सर्वच भारताकडे अपेक्षेने पाहात आहेत. हरियाणातील स्थानिक प्रश्नांवर मोदींनी त्यांच्या खास शैलीत, याला जबाबदार कोण आहे? असा सवाल जनतेला केला.
एनडीए सरकारच्या योजनांची उजळणी
मोदी म्हणाले, आम्ही सरकार स्थापन केल्यानंतर पहिले काम केले ते लोकांचे बँक खाते उघडण्याचे. देशाला स्वातंत्र्य मिळून पन्नासहून अधिक वर्षे झाली तरी अर्ध्याहून अधिक गरीबांची बँक खाती नाहीत. त्यांनी बँकेचे तोंडच पाहिलेले नाही. त्यांच्यासाठी बँक त्यांच्या दारात गेली. गरीब जनतेने बँक खाते उघडले तर त्यांच्या आकस्मिक आजारपणासाठी एक लाखांचा विमा सरकार देणार आहे. आम्ही चीनकडून मानसरोवरसाठी जाण्यासाठी मार्ग मोकळा करुन घेतला आहे.
कर्नालला स्मार्ट सीटी करण्याचे आश्वासन देत भाजपला एकहाती सत्ता देण्याची मागणी त्यांनी केली.