आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Work For Handful Industralists Rahul Gandhi

मूठभर उद्योगपतींसाठीच मोदींचे काम, राहुल गांधींचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिरोजपूर झिरका - पंतप्रधान नरेंद्र मोदी मूठभर उद्योगपतींसाठीच काम करत असल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी हरियाणातील मेवात जिल्ह्यातील पहिल्या प्रचारसभेत केला.राहुल म्हणाले, मोदींनी काही अमेरिकन कंपन्यांच्या इशा-यावरून औषधांच्या किमतीवरील नियंत्रण हटवल्यामुळे त्यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे कर्करोगावरील एका औषधाची किंमत ८ हजारांवरून एक लाख रुपयांपर्यंत गेल्याचा आरोप राहुल गांधींनी केला.
विशेष म्हणजे मोदींनी अमेरिका दौ-यापूर्वी तेथील कंपन्यांना खुश करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचेही ते म्हणाले. या निर्णयामुळे मधुमेहाची औषधेही महागल्याचा आरोप त्यांनी केला. मोदी फक्त मोठ्या उद्योगपतींसाठी काम करतात. गेल्या ६० वर्षांत काँग्रेसने काहीच केले नसल्याचा आरोप म्हणजे देशाच्या प्रगतीत मोलाची भूमिका निभावणा-या शेतकरी आणि मजुरांचा अपमान असल्याचे राहुल गांधी म्हणाले.