आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NLD Released The Fourth List For Haryana Assembly Election

\'एनएलडी\'ची चौथी यादी जाहीर, मुलगा उचाना तर मातोश्री डबवालीतून लढणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जींद- हरियाणात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. इंडियन नॅशनल लोकदलाने (एनएलडी) उमेदवारांची चौथी आणि अंतिम यादी जाहीर करून सगळ्याना धक्का दिला आहे. पक्षाचे युवा खासदार दुष्यंत चौटाला यांना उचाना कला येथून तर दुष्यंत यांच्या मातोश्री नयनतारासिंह डबवाली येथून निवडणूक लढणार आहे. नयनतारा सिंह या पक्षाचे महासचिव अभय चौटाला यांच्या पत्नी आहेत.
उचाना कला हे एनएलडीचे प्रमुख ओमप्रकाश चौटाला यांचा मतदारसंघ आहे. त्यात दुष्यंत चौटाला हे उचना येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. या पार्श्वभूमीवर दुष्यंत यांना ओमप्रकाश चौटाला यांचे राजकीय उत्तराधिकारी मानले जात आहे. नयनतारासिंह या निवडणूक लढणार्‍या चौटाला कुटूंबातील पहिल्या महिला आहे.

दुष्यंत आणि नयनतारा सिंह निवडणूक लढणार असल्याची घोषणा मंगळवारी करण्‍यात आली होती. अभय चौटाला यांनी स्वत: याबाबत माहिती दिली. देवीलाल चौधरी यांचा 100व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम 25 सप्टेंबरला होणार आहे. कार्याक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी चौटाला येथे आले होते.

अभय चौटाला यांनी यावेळी राज्यातील उर्वरित पाच जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. कुरुक्षेत्रमधील लाडवा येथील उमेदवारी विद्यमान आमदार शेर सिंह बडशामी यांची पत्नी बच्चन सिंह कौर बडशामी यांनी दिली आहे. आमदार शेर सिंह यांना शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ओमप्रकाश चौटाला आणि अजय चौटाला यांच्यासोबत 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बडखलमधून चंदर भाटिया, फरीदाबाद ओल्डमधून प्रवेश मेहता यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाटीया आणि मेहता यांना भाजपने उमेदवारी न द‍िल्याने दोन दिवसापूर्वीच एनएलडीमध्ये प्रवेश केला होता.
अभय चौटाला यांनी शिरोमणी अकाली दलाशी समझोता करून अंबाला सिटी आणि कालांवाली सोडली आहे. अकाली दल लवकरच उमेदवारांची घोषणा करणार आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, एनएलडीच्या उमेदवारांची छायाचित्रे...