आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi Today Will Hisar For State Assembly Election2014

पंतप्रधान मोदींनी सोनिया गांधींवर साधला निशाणा, भ्रष्‍टाचार आणि लुटारु नेत्यांचा बोलबाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिसार- हरियाणात सर्वत्र कॉंग्रेसचा भ्रष्टाचाराचा चिखल पसरला आहे. या चिखलातच भारतीय जनता पक्ष आपले 'कमळ' फुलवणार असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी हिसार येथील जाहीर सभेत संबोधित केले.

मोदी यांनी यावेळी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्या 'डीएलएफ डील' चा मुद्दा उपस्थित केला. हरियाणातील हुड्डा सरकारने वढेरा यांच्या जमिनीची डील करून दिली आहे. विशेष म्हणजे हुड्डा यांनी निवडणुकीची आदर्श आचार संहिता लागू होण्याआधीच या डीलला मंजुरी दिली आहे. याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच चौकशी करणार आहे.

दरम्यान, रॉबर्ट वढेरा आणि डीएलएफ यांच्या झालेले डील आयएएस अशोक खेमका यांनी रद्द केले होते. परंतु नंतर या डीलला हुड्डा सरकारने मंजूरी दिल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

मोदी म्हणाले, हरियाणात काही लोक तुरुंगात शपथ घेण्‍याचे स्वप्न पाहात आहे. राज्यातील जन‍तेशी खोटे बोलून त्यांची दिशाभूल करत आहे. त्यामुळे हरियाणात विकास दूरच भ्रष्टाचार आणि लुटारु नेतांचा जास्त बोलबाला आहे. राज्य सरकारने आतापर्यंत फक्त आपल्या कुटुंबियांसाठी राजकीय दुकान सुरु ठेवले आहे, यांचे हे दुकान आपल्याला लवकरच बंद करायचे असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी संबोधित केले.

भारतीय जनता पक्षाने प्रचार मोहिम धडाक्यात सुरु झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खुद्द भाजपच्या प्रचारार्थ हरियाणासह महाराष्‍ट्रात जाहीर सभा घेत आहेत. मोदी आज (सोमवारी) हरियाणामधील हिसारसह कुरुक्षेत्र आणि फरीदाबाद येथेही जाहीर सभा घेणार आहेत. भाजपच्या उमेदवार कमल गुप्ता यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी हिसारमध्ये आले आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी कॉंग्रेसवर जोरदार प्रहार केला. कॉंग्रेसने कमल नामक एका अपक्ष उमेदवाराला भाजप विरोधात उभे केले आहे. तर पक्षाचे लोक हातात माझे छायाचित्र घेऊन मत मागत दिसत आहे. एवढेच नव्हे तर निवडणुकीनंतर मोदींसोबत जाणार असल्याचेही जनतेला खोटे सांगत आहेत.
मोदी म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी पराभव दिसत आहे. म्हणून त्यांनी आचार संहितेचे उल्लंघन करून त्यांच्या जावईला सरकारी जमीन दिली आहे. हरियाणातील निवडणुकीच्या निकालानंतर हुड्डा यांचे दुकान बंद होणार असल्याचेही मोदी यांनी यावेळ‍ी सांगितले.

पुढील स्लाइड्‍सवर याचा, शेतकर्‍यांना मिळणार 'सोयल हेल्थ कार्ड'