आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवाईसुंदरीच्या आत्महत्येनंतर या आमदाराची झाली बदनामी, 5 वर्षांमध्ये कमावले 33 कोटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हवाईसुंदरी गीतीका शर्मा आणि हरियाणा लोकहित पार्टीचे चीफ गोपाल कांडा

फरीदाबाद -
एयरलायन्सचे मालक गोपाल कांडा 2009 मध्ये सिरसामधून अपक्ष आमदार झाले. बहुमतापासून केवळ सहा पाऊले दूर असलेल्या काँग्रेसला समर्थन करत कांडा गृहराज्यमंत्री बनले. मात्र त्यांची एअरलायन्सची हवाई सुंदरी गीतीका शर्मा हिने आत्महत्या केली आणि तिच्या सुसाईडनोटमध्ये कांडा यांचे नाव लिहिले. या प्रकरणामुळे कांडा यांचे मंत्रीपद गेले. अनेक महिने तुरूंगवास भोगला. एवढ्या संकटातून जातानाही कांडा यांच्या उत्पन्नावर काडीमात्र फरक पडला नाही. कांडा यांनी अवघ्या पाच वर्षात तब्बल 33 कोटी रुपये कमावले. ही माहिती आम्ही नाही तर कांडा यांनी निवडणूकीसाठी भरून दिलेल्या जाहिरनाम्यात दिली आहे. कांडा मागील सर्व घटना विसरून आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत.
संपत्तीसोबत कर्जही वाढले
स्वतःच्या हरियाणा लोकहित पार्टी स्थापन करून निवडणूकीच्या मैदानात उतरलेले गोपाल कांडा यांनी आपल्या जाहिरनाम्यात 90 कोटींची संपत्ती असल्याचे सांगितले आहे. मात्र 2009 मध्ये त्यांची संपत्ती जवळपास 63 कोटी एवढी होती. म्हणजेच मागील पाच वर्षात कांडा यांनी तब्बल 33 कोटी रुपये जमावले. 90 कोटीमध्ये 70.52 कोटींची चलसंपत्ती, तर 14 कोटींची अचल संपत्ती आणि 3923 ग्रॅम दागिने असल्याचा दावा करण्यात आला आहे. एवढेच नाही तर पाच वर्षांमध्ये कांडा यांच्यावर त्यांच्या कमाईपेक्षा जास्त कर्ज वाढले आहे. 2009 मध्ये कांडा यांच्यावर केवळ 6.42 लाख रुपयांचे कर्ज होते. जे आता वाढून 67 कोटी एवढे झाले आहे.

पत्नीकडेही आहे भरघोस संपत्ती
जाहिरनाम्यात गोपाल कांडा यांनी आपल्या पत्नीच्या नावावर 20 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे लिहिले आहे, मात्र 2009 त्यांची पत्नी सरस्वती यांच्या जवळ केवळ 49 लाख रुपयांचे दागिने होते. सरस्वती यांच्या संपत्तीमध्ये जवळपास 10.85 कोटींची चल संपत्ती, 18 कोटी 45 लाखांची अचल संपत्ती आणि जवळपास 1572 ग्रॅमचे दागिने आहेत. एवढेच नाही तर पतीप्रमाणे यांच्यावरही जवळपास साडे चार कोटींचे कर्ज आहे.