आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

26 राज्यांचा बॉक्सिंग इंडियाला पाठिंबा, नवीन कार्यकारिणीसाठी नव्याने निवडणुका घेणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशातील बॉक्सिंग या खेळाचे आंतरराष्ट्रीय संघटनेने स्थगित केलेले कार्य पुढे सुरू व्हावे, या उद्देशाने 26 राज्यांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन ‘बॉक्सिंग इंडिया’ या संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेला ‘आयबा’ या जागतिक बॉक्सिंग संघटनेने हंगामी मान्यता दिली आहे. बॉक्सिंग इंडियाच्या प्रस्तावित घटनेला ‘आयबा’ने मान्यता दिली आहे. 26 राज्यांच्या प्रतिनिधींपुढे ही घटना ठेवण्यात आली. राज्य संघटनेच्या करारानुसार नव्या कार्यकारिणीसाठी निवडणुका नव्याने घेण्यात येतील. ‘आयबा’ने भारतीय बॉक्सिंग संघटनेवर यापूर्वीच बंदी आणली आहे. त्यानंतरही या संघटनेने काहीच हालचाल न केल्यामुळे अन्य राज्यांचे प्रतिनिधी पुढे सरसावत आहेत.