नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी हरियाणातील कलायत येथील एका प्रचारसभेत पाकिस्तानला इशारा दिला. ते म्हणाले, पाकिस्तानकडून होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाला पांढरे झेंड फडकावून नाही, गोळीला गोळीनेच उत्तर देऊ. असे त्यांनी पाकिस्तानला ठणकावले. पांढरे झेंडे फडकावणे हे मागील सरकारचे काम होते, आता काळ बदलला आहे. आता तसे होणार नाही. राजनाथसिंह म्हणाले, शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर मिटिंग, सिटींग आणि इटिंग हा काळ आता संपला आहे. आता भारत तोडीस तोड उत्तर देईल. दरम्यान, आज ईद निमीत्त बॉर्डरवर भारताकडून पाठवण्यात आलेली मिठाई पाकिस्तानने नाकरली असून सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
राजनाथसिंह म्हणाले, पाकिस्तानकडून शनिवारी सीमेवर गोळीबार करण्यात आला. आम्ही
आपल्या सैनिकांना त्यांना तोडीसतोड उत्तर देण्याच्या सुचना दिल्या आहेत. ते म्हणाले, 'भारत कमकुवत नाही. आमच्या सैनिकांच्या जीवाशी खेळ करून आम्ही त्यांना शांती वार्ता करण्याचे निमंत्रण देणार नाही. आता जशास तसे उत्तर दिले जाईल. भाजप सत्तेत आल्यापासून पाकिस्तानकडून 17वी कारवाई होती, तरीही भारताने पांढरे झेंडे दाखवलेले नाही.'
राजनाथसिंह म्हणाले, 'भारताला सर्वच देशांसोबत शांततेचे आणि मैत्रिचे नाते निर्माण करायचे आहे. मात्र, त्याच्या उलट होत असेल तर आम्ही चोख उत्तर देण्यास सक्षम आहोत.'