आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pritam Khade Daughter Of Munde To Contest Loksabha Election News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर या कन्येने केले राजकारणात पर्दापण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- भाजपचे ज्येष्ठे नेते आणि दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांची कन्या प्रीतम खाडे-मुंडे)

बीड- भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर त्यांची कनिष्ठ कन्या डॉ.प्रीतम खाडे-मुंडे यांनी राजकारणात पदार्पण केले आहे. मुंडे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बीड लोकसभेच्या होणार्‍या पोटनिवडणुकीसाठी प्रीतम खाडे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. प्रीतम यांनी जन्मभूमी म्हणजे, परळी येथून प्रचारास सुरुवातही केली आहे. दरम्यान, 15 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूकीसोबत बीडमध्ये लोकसभेच्या एका जागेसाठी मतदान होणार आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बीड लोकसभेच्या जागेसाठी त्यांची ज्येष्ठ कन्या आणि आमदार पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत होते. परंतु संघर्ष यात्रेदरम्यान पंकजा यांनी त्या राज्यातच राहाणार असल्याचे स्पष्ट केले होते.
दुसरीकडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीडमधून कोणताही उमेदवार उभा न करण्‍याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे प्रीतम खाडे यांनी अर्धी लढाई जिंकल्याचे बोलले जात आहे. गेल्या मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश धस यांच्यात कट्याची लढत पाहायला मिळाली होती.

शाही विवाह...
2009 मध्ये प्रीतम आणि डॉ.गौरव खाडे यांच्याशी विवाह झाला होता. पुण्यात झालेल्या शाही विवाहात भाजपसह अन्य पक्षातील बडे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ.गौरव खाडे हे सध्या अमेरिकेत आहेत.

पुडील स्लाइड्‍सवर पाहा, प्रीतम खाडे यांचे छायाचित्रे...