आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP To Bank On Modi Again To Deliver Jharkhand, J&K

झारखंड, काश्मिरात ‘मोदी मॉडेल’च भाजपचा आधार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - झारखंड जम्मू -काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा ‘मोदी कार्ड’चा पुरेपूर वापर करणार आहे. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पक्षाचे स्टार प्रचारक असतील. त्यांचे वलय, काम आणि नावाच्या आधारेच मते मागण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्यामुळे या राज्यांतील पक्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणादेखील निवडणुकीनंतरच केली जाणार आहे. महाराष्ट्र आणि हरियाणात ‘मोदी कार्ड’आधारे भरीव यश मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या म्हणण्यानुसार या दोन्ही राज्यांतील निवडणुकांमध्ये पंतप्रधान मोदी हेच आमच्या पक्षाचा चेहरा असतील. त्यांच्या नावाआधारेच या निवडणुका लढवल्या जातील. वास्तविक भाजपच्या या उत्साहाचे खरे कारण मोदींमुळेच महाराष्ट्र हरियाणात पक्षाला मिळालेले यश हे आहे. दोन्ही राज्यांत या निवडणुकीत भाजप गावागावात पोहोचली. महाराष्ट्रात शिवसेनेने युती तोडली असतानाही पक्षाला स्वबळावर मोठे यश मिळाले. जाटलँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरियाणात भाजपची ओळख इतके दिवस शहरी पक्ष अशी होती. पण या निवडणुकीत पक्षाने ग्रामीण भागात मोठे यश मिळवत स्वबळावर राज्यात बहुमत सत्ता प्राप्त केले. मोदी लाट थांबली नसून ती कायम असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. पहिल्या शंभरी दिवसांत मोदी सरकारने ज्या प्रकारे काम केले, मोठे धोरणात्मक निर्णय घेतले, त्यामुळे मोदी सरकारविषयी लोकांचा विश्वास कायम आहे. त्यांच्या करिष्म्याच्या आधारे जम्मू काश्मीर, झारखंडमध्येही स्वबळावर सरकार बनवता येईल, इतके यश नक्कीच मिळवता येईल. असे भाजप नेत्यांना वाटत आहे. त्यासाठीच पक्ष पुन्हाएकदा या राज्य िनवडणुकांत मोदी कार्ड पुढे करणार आहे.

काश्मीरमध्ये सर्व जागा लढवणार
पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले, हरियाणाप्रमाणेच झारखंडमध्ये आजपर्यंत आघाडी सरकारच सत्तेते येत राहिले आहे. या ठिकाणी भ्रष्टाचार तसेच रखडलेला विकास हा ठळक मुद्दे असून एका पक्षाचे स्थिर सरकार आले तर या समस्या दूर होतील, राज्याचा विकास होईल, असे लोकांना वाटते. सद्यस्थित भाजपला देशात ठोस पर्याय दृष्टिक्षेपात नाही. जम्मू काश्मीरमध्ये पाकच्या नापाक हरकतींना केंद्र सरकारने चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरमधील जनतेला हे चित्र मोदीच बदलू शकतात, हा संदेश देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा निवडणुकीनंतरही सोडवता येऊ शकतो, असे भाजपचे म्हणणे आहे.