आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Exit Poll Bjp Will Form Majority Government In Jharkhand

EXIT POLL: झारखंडमध्ये भाजपला तर J&Kमध्ये PDP ला जास्त जागा मिळण्याची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- झारखंड आणि जम्‍मू-काश्‍मीरमध्ये 2014 च्या विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी पाच टप्प्यात मतदान झाले. मतदानोत्तर चाचणी अर्थात Exit Poll चे अंदाज समोर येण्यास सुरुवात झाली आहे. झारखंडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्‍याचा अंदाज Exit Poll मधून वर्तवण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात आली असला तरी पीपुल्स डेमोक्रेटिक पक्षाला (पीडीपी) सर्वांत जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. खासगी वृत्तवाहिनी 'आज तक- सिसरो' आणि एबीपी न्यूज निल्सन आणि सी वोटरने मतदानोत्तर चाचणी अर्थात Exit Poll जाहीर केले आहेत. चाचणीत झारखंडमध्ये बाजूने कौल देण्यात आला आहे. भाजपच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

झारखंडच्या 81 सदस्यीय विधानसभेत भाजप आणि घटक पक्षांना 41 ते 49 जागा मिळतील. ही चाचणी पहिल्या चार टप्प्यात झालेल्या मतदानावर आधारित आहे. जम्मू-काश्मीर विधानसभेत बहुमतासाठी 44 जागा आवश्यक आहेत.

Exit Poll नुसार, विद्यमान मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाला (झामुमो) 15 ते 19 जागांवर समाधान मानावे लागले. झामुमो हा दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष ठरण्याची शकता आहे. कॉंग्रेस आणि त्याच्या मित्र पक्षांना 7 ते 11 जागांवर विजय म‍िळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अन्य पक्षांना 8 ते 12 जागा मिळण्याची शक्यता आहे. 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि घटक पक्षांना फक्त 23 जागांवर विजय मिळाला होता.
'आज तक-सिसरो'नुसार...
भाजप आणि घटक पक्ष - 41 ते 49 जागा
झारखंड मुक्ती मोर्चा- 15 ते 19
कॉंग्रेस - 7 ते 11
अन्य 8 ते 12

Exit Poll नुसार (टक्केवारी)
भाजप- 36 टक्के (+5.9 टक्के)
झामुमो- 20 टक्के (+8.3 टक्के)
कॉंग्रेस- 16 टक्के (-5.6 टक्के)
अन्य- 28 टक्के (-8.7 टक्के)

सी वोटरच्या Exit poll नुसार जम्मू-काश्मीरमध्ये पीपुल्स डेमोक्रेटिक पक्ष (पीडीपी) हा सगळ्यात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भाजप-27 ते 33
पीडीपी-32 ते 38
कॉंग्रेस-4 ते 10
नॅशनल कॉन्फ्रेन्स-8 ते 14
पुढील स्लाइड्‍सवर याचा, एबीपी न्यूज निल्सनच्या Exit Poll चा अहवाल...