आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झारखंडच्या Ex CM ला झाली होती तुरुंगात मारहाण, कधी घरांच्या खिडक्या लावण्याचे केले काम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची (झारखंड) - झारखंडमधील चार टप्प्यांचे मतदान संपले आहे. या चार टप्प्यांमध्ये राज्यातील अनेक दिग्गजांचे भवितव्य इव्हीएम मशिनमध्ये बंद झाले आहे. आता शेवटच्या टप्प्याचे मतदान होणे बाकी आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज मैदानात उतरले आहेत. यात अपक्ष आमदार आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा देखील आहेत. कोडा यांच्यावर चार हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. झारखंडचे मुख्यमंत्री राहिलेले कोडा हे कधीकाळी घरांना लोखंडी खिडक्या बसवण्याचे काम करत होते.
मधु कोडा हे अपक्ष आमदार म्हणून सभागृहात दाखल झाले आणि त्यांनी केलेल्या घोटाळ्यांची मालिका समोर येऊ लागली. हा आकडा 4000 कोटींपर्यंत जाऊन पोहोचला आणि देशात राजकीय भूकंप झाला. हा तत्कालिन सर्वात मोठा घोटाळा होता. मधू कोडा हे 709 दिवस झारखंडचे मुख्यमंत्री होते.
तुरुंगात कैद्यांनी केही होती कोडांना मारहाण
चार हजार कोटींच्या घोटाळ्यानंतर मधू कोडा यांना तुरुंगात जावे लागले होते. तिथे कैद्यांनी त्यांना बेदम मारहाण केली होती. मारहाण अशी होती, की कोडा यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. त्याचवेळी त्यांच्या आमदार पत्नी यांनी बाहेर धरणे धरले होते.
विधानसभा निवडणुकीत आता कोडा यांच्या घोटाळ्यासोबतच त्यांच्या लग्नातील किस्से देखील चर्चीले जात आहेत. कोडा यांच्या लग्नात त्यांच्या वडीलांनी पाहुण्यांना देशी दारू विकल्याची चर्चा चवीने केली जात आहे.

पुढील स्लाइडमध्ये, वडिलांची इच्छा होती, मुलाने पोलिस इन्सपेक्टर बनावे