आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS: हेलिकॉप्टरमधून उतरले आणि बाईकवरून फिरले गृहमंत्री राजनाथ सिंह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किरीबुरू/ रांची (झारखंड) - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह मंगळवारी भारतीय सेनेच्या एमआय-17 हेलिकॉप्टरने सारंडाच्या थोलकोबाद येथे पोहोचले. याठिकाणी केंद्रीय राखीव पोलिसचे निर्देशक दिलीप त्रिवेदी, सुरक्षा सल्लागार विजय कुमार, मुख्य सचिव सुधीर प्रसाद आणि इतर अधिकार्‍यांनी राजनाथ यांचे स्वागत केले.
गृहमंत्र्यांना तेथून थोलकोबाद सीआरपीएफ कॅम्पमध्ये कारच्या साह्याने नेण्याचे नियोजन होते. मात्र राजनाथ यांनी दुचाकीवरून जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार दुचाकीची व्यवस्था करण्यात आली. त्यांनी सारंडाच्या रस्त्यावरून जवळपास 800 मीटर पर्यंत दुचाकीवरून प्रवास केला.
यावेळी राजनाथ यांनी एका जवानाला दुचाकीच्या मागील सिटावर बसण्यास सांगितले. मात्र सुरक्षेचे कारण पुढे करत त्या जवानाने "सर हे धोकादायक ठरू शकते" असे सांगितले. मात्र राजनाथ यांनी "काळजी करू नकोस, मागे बस. मी तरूण असताना खुप वेगाने बाईक चालवली आहे" असे उत्तर दिले. यानंतर राजनाथ सिंह त्या जवानाला घेऊन दुचाकीवरून निघाले.

निवडणूकीच्या तयारीविषयी घेतली माहिती
केंद्रीय गृहमंत्री यांनी सर्वात पहिले प्रदेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत काहीवेळ बैठक घेतली. या दरम्यान त्यांनी विधानसभा निवडणूकीविषयी चर्चा केली. यानंतरच्या अभिनंदन समारोहानंतर राजनाथ प्रदेश भाजप नेत्यांसोबत अल्पोपहारास बसले. यावेळी राजनाथ यांनी राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या तयारी विषयी चर्चा केली.
पुढील स्लाईडवर पाहा, राजनाथ सिंह यांची इतर छायाचित्रे