महाराष्ट्र विधानसभा निवडणूक यावेळी अनेक अर्थाने महत्त्वाची मानली जात आहे. या निवडणूकीदरम्यान अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. एक तर महायुतीचे विसर्जन झाले तर दुसरीकडे आघाडीचाही काडीमोड झाला. त्यामुळे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे सर्व बडे पक्ष आता स्वतंत्र निवडणूक लढत आहेत. त्यातच
लोकसभा निवडणूकीत मोदी लाटेमुळे संपूर्ण देशात भाजपचीच चलती होती. त्यामुळे भाजपला महाराष्ट्राच्या विधानसभेतही मोदी लाट चालेल असे वाटत आहे. म्हणून या विधानसभा निवडणूकीत भाजपच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान
नरेंद्र मोदींनीच महाराष्ट्रात प्रचारासाठी हजेरी लावली आहे.
मोदी दिवसांतून जवळपास दोन ते तीन सभा घेत आहेत. मात्र यंदाच्या या प्रचारात मोदींना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. एकतर महायुती तुटली असून लोकसभेच्या निवडणूकीवेळी केलेली आश्वासने सरकार येऊन तीन महिने उलटून गेली तरी पूर्ण झालेली नाहीत. त्याचाही परिणाम विधानसभा निवडणूकीत पाहायला मिळू शकतो. अजूनही असे अनेक मुद्दे आहेत जे मोदींसमोर आव्हान ठरू शकतात. चला तर मग पाहूयात कोणकोणते आहेत हे 10 ठळक मुद्दे...
पुढील स्लाईडवर वाचा, कोणती आहेत नरेंद्र मोदींसमोरील ही 10 आव्हाने...