आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 10 Things In Mahayuti Seat Distribution Problem In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या, महायुतीतील जागावाटपाच्या तिढ्यातील 10 महत्त्वपूर्ण घडामोडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विधानसभा निवडणूकीला अवघे 22 दिवस शिल्लक असले तरी महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष असणार्‍या शिवसेना-भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात जागा वाटपावरून चांगलीच जुंपली आहे. या निवडणूकीत हे सर्वच पक्ष एकट्याने निवडणूक लढणार का अशी शंका सर्वत्र पसरली आहे. कोणीही मागे हटायला तयार नाही. त्यामुळे दररोज नवनवे फॉर्म्यूले निर्माण होत आहेत. त्यातच शिवसेनेने काल शेवटची ऑफर म्हणून शिवसेना १५१, भाजप ११९, इतर १८ असा फॉर्म्यूला भाजपसमोर ठेवला होता. मात्र भाजपने तो नाकारला. यामुळे आता शिवसेना आणि भाजप स्वतंत्र निवडणूक लढणार का? असा प्रश्न राजकीय वर्तूळात पडला आहे.

पाहूयात या तिढ्यातील 10 महत्त्वपूर्ण घडामोडी

१) भाजप-शिवसेना युतीचे मागील २५ वर्षांपासूनचे नाते यंदाच्या विधानसभा निवडणूकीत भंग पावण्याच्या काठावर आहे. कारण दोन्हीही पक्ष जागावाटपाच्या मुद्द्यावर तटस्थ भूमिका घेत आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजप आज उमेदवारांची पहिली यादी जाहिर करू शकते.
आमच्या याद्या तयार आहेत. वेळ पडली तर आम्ही एकट्याने निवडणूक लढू...वाचा काय म्हणाले उद्धव ठाकरे...