आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चारित्र्यवान उमेदवाराला "आम आदमी'चा पाठिंबा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - लोककल्याणकारी सरकार असावे म्हणून विधानसभेत चारित्र्यवान लोकप्रतिनिधी पाठवणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा उमेदवारालाच आम आदमी पक्षाचा पाठिंबा असेल. हा उमेदवार काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, मनसेचा असणार नाही, तर पाठिंबा देण्याविषयीचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेतला जाईल, असे "आप'चे राज्य कार्यकारिणी सदस्य सुभाष लोमटे यांनी स्पष्ट केले. लोमटे म्हणाले, "आप'ला वेळ कमी मिळाल्याने जनतेपर्यंत पोहोचता आले नाही. शिवाय संघटन मजबूत नव्हते म्हणून विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला. "आप'ने सप्टेंबरपासून "मिशन विस्तार'चे काम सुरू झाले आहे. २६ सप्टेंबर रोजी कलश मंगल कार्यालयात मिशन विस्ताराचे राष्ट्रीय संयोजक पृथ्वी रेड्डी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यात पक्षाचा विस्तार करण्यासाठी धोरण निश्चित करण्यात आले. विधानसभेत कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत मंगळवारपर्यंत राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांकडून कळवण्यात येणार आहे. मतदारांनी गोरगरिबांची समस्या सोडवणाऱ्या उमेदवारांनाच विधानसभेत पाठवावे, असे आवाहन लोमटे सचिव हरमितसिंग यांनी सांगितले.