आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS अभिनेत्याची वहिनी आणि माजी मुख्यमंत्र्यांची सून सध्या पतीच्या प्रचारात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आज तुम्हाला एका अशा महिलेची भेट घडवणार आहोत ज्या एका बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नी, माजी मुख्यमंत्र्यांच्या सून आणि विधानसभा निवडणूक लढमावणा-या एका माजी आमदाराची पत्नी आहे. या आहेत आदिती देशमुख. त्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सून आणि अभिनेता रितेश देशमुख याची वहिनी आहे. तसे पाहता आदिती राजकारणात सक्रिय नाहीत. पण सध्या त्या लातूर विधानसभा मतदारसंघात पतीच्या प्रचारासाठी फिरत आहेत.
सात वर्षे केले मॉडेलिंग
लग्नापूर्वी आदिती यांनी सात वर्षे मॉडेलिंग केले होते. तसेच अनेक टिव्ही मालिकांमध्येही त्यांनी काम केले आहे. मॉडेलिंगदरम्यान त्यांचा ओळख अमित देशमुख यांच्याशी झाली होती. दोघांमध्ये अफेअर असल्याच्या चर्चा होत्या. पण नंतर दोघांनी अरेंज मॅरेज असल्याचे सांगितले.

आदितीचे वडील मोठे व्यावसायिक
आदितीचे वडिल बेंगळुरूचे मोठे उद्योगपती आहेत. काही वर्षांपूर्वी ते मुंबईहून बेंगळुरूला शिफ्ट झाले होते. दोन्ही कुटुंबांमध्ये जुने संबंध होते. त्यामुळे आदिती आणि अमित यांचे लग्न जुळले होते.
पुढील स्लाइडवर पाहा, आदितीचे निवडक फोटो...