आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aditi Deshmukh Wife Of Ex Minister Amit Deshmukh

या आहेत माजी मुख्यमंत्र्याच्या सुनबाई-अभिनेत्याची वहिणी, पतीसाठी केला प्रचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कधीकाळी टेलिव्हिजन आणि मॉडेलिंगच्या जगात चर्चेत असेलेल्या अदिती आता माजी मुख्यमंत्र्यांची सुन आणि एका अभिनेत्याची वहिणी आहे. आम्ही बोलत आहोत अदिती अमित देशमुख यांच्याविषयी. अमित देशमुख लातूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विलासराव देशमुख यांच्यानंतरची ही पहिली निवडणुक आहे. त्यामुळे दरवेळेप्रमाणे अभिनेता रितेश याही वेळी भावाच्या प्रचारासाठी लातूरमध्ये येऊन गेला. मात्र, अदिती या सावलीसारखी पती अमित देशमुख यांना सोबत करत आहे. अदिती यांचा आणि राजकारणाचा तसा काही संबंध नाही, मात्र, महाराष्ट्रातील एका दिग्गज राजकीय घराण्यात सुन म्हणून आल्यानंतर राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे हे ओघाने आलेच. तसेच काहीसे आदितीसोबत झाले आहे. पती अमित देशमुख यांच्या प्रचारासाठी त्या प्रत्येकवेळी त्यांच्या सोबत होत्या.
सात वर्षे केले मॉडेलिंग
लग्नाआधी आदितीने सात वर्षे मॉडेलिंग केले. त्यासोबतच काही टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. मॉडेलिंगच्या दरम्यानच अमित सोबत त्यांची ओळख झाली. दोघांच्या अफेअरचीही चर्चा झाली होती, मात्र, नंतर त्यांचे अॅरेंज मॅरेज झाले.
अदिती यांचे वडील उद्योगपती
अदिती यांचे वडील बंगळुरुचे मोठे उद्योगपती आहेत. काही वर्षांपूर्वी ते मुंबईतून बंगळुरुला शिफ्ट झाले आहेत. देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये जुने संबंध होते. ते नंतर अमित - अदिती यांच्या लग्नाने नात्यात बदलले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, अदिती यांची निवडक छायाचित्र