माझ्याआयुष्यात जे काही वाईट दिवस आले असतील त्यातला एप्रिल २०१३ हा सर्वात मोठा वाईट दिवस. राज्यातील दुष्काळामुळे माझ्यासह सर्वच चिंतातुर होते. दुष्काळ निवारणासाठी आम्ही दिवसरात्र काम करीत होतो. हे करताना विरोधक सहकार्याची भावना सोडून टीका करण्यातच धन्यता मानत होते. हे सर्व विषय डोक्यात असल्यामुळे इंदापूर येथील सभेमध्ये पाणीप्रश्नावर भाषणात उल्लेख आल्यामुळे माझ्याकडून अपशब्द वापरले गेलेत. राज्याचा जबाबदार उपमुख्यमंत्री म्हणून हे बोलायला नको होते, हे लक्षात आल्यावर मी प्रायश्चित्त घ्यायला कृष्णा कोयनेच्या प्रीती संगमावर आत्मक्लेश केला. या वेळी माध्यमांनी टीका केली. माध्यमांचा अंकुश म्हणा किंवा माध्यमांचे लक्ष म्हणा, राजकीय क्षेत्रातील सर्वांनाच कुठे काय बोलावे याचे भान ठेवणे क्रमप्राप्त आहे.