आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ajit Pawar Controversial Statement In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

होय मी टग्याच आहे!; वाचा, अजित पवार यांची वादग्रस्त वक्तव्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजित पवार आणि वादग्रस्तता यांचे अतूट नाते आहे. अजित पवारांनी एखादे भडक वक्तव्य करावे आणि त्यामुळे राजकीय क्षेत्रात गदारोळ माजणार नाही असे अशक्यच! त्यामुळेच अजित दादा नेहमीच चर्चेत राहतात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वात जास्त कोणी वादग्रस्त वक्तव्ये केली असतील तर ती म्हणजे केवळ अजित दादांनीच. दादांची दादागिरी एवढी की, वादग्रस्त वक्तव्ये करून तेवढ्यावरच न थांबता अनेक वेळा त्यांनी उलट उत्तरेही दिली आहेत. मात्र या सर्व प्रकारातून मनस्ताप होतो तो म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा आणि अजित पवारांचे काका शरद पवार यांना. शरद पवार नेहमीच या सर्व प्रकारात धाव घेत अजित दादांचा बचाव करतात.
अशा या अजित पवारांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा थोडक्यात आढावा खास तुमच्यासाठी....
१) होय मी टग्याच आहे!
सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना स्वतःला टग्या संबोधून घेत अजित पवारांनी त्यांची दादागिरी पुन्हा एकदा दाखवून दिली. या जाहिर कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, 'तालुका पातळीवर निवडणूक जिंकण्यासाठी खूप काही करावे लागते. हे येड्यागबाळ्याचे काम नाही. त्यामुळे सदमार्गी लोक या वाटेकडे फिरकतही नाही. या कामासाठी गावाने ओवाळून टाकलेले टगे किंवा अर्कच कामी येतात. मी पण अशाच तालुका पातळीवर निवडून आलो आहोत, त्या अर्थी मीसुध्दा टग्याच आहे' या त्यांच्या वक्तव्याला माध्यमांनी चांगलेच उचलून धरले तसेच त्यांच्या या आरेरावीपणावर टीकाही करण्यात आली.

पुढील स्लाईडमध्ये वाचा... अजित पवारांची इतर वादग्रस्त वक्तव्ये, ज्यामुळे राजकीय क्षेत्रात उठले वादळ...