आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • All India Majlis e Ittihad Al Muslimin Parties Leader Owaisi Brother News In Marathi

वाचा, ओवेसी बंधूंविषयी, एक ‘संसदरत्न’ तर दुसरा ‘चिथावणीखोर\' भाषणासाठी प्रसिध्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मजलिस- ए- इत्तेहादूल मुस्लिमीम पार्टीचे (एएमआयएम) संस्थापक सुल्तान सलाउद्दीन ओवेसी यांना तीन मुले आहेत. त्यापैकी असदउद्दीन (खासदार), अकबरुद्दीन(आमदार) आणि बु-हानुद्दीन(संपादक) अशी तीन मुले आहेत. असदउद्दीन यांना लोसभेतील ‘संसदरत्न’ पुरस्कार मिळाला असून अकबरुद्दीनने जहाल आणि चिथावणीखोर भाषणांमुळे तुरुंगाची हवा खाल्ली आहे.
पिता सलाउद्दीन यांच्यानंतर असदउद्दीन आणि अकबरुद्दीन हे दोघे एमआयएम पक्षाचं नेतृत्व करत आहेत. दोन्ही भावांची राजकीय वाटचाल मुस्लिम समाजाला एकसंध करून सुरू आहे. तर बु-हानुद्दीन हे ‘इतेमाद’ या उर्दू दैनिकाचे संपादक आहेत. ओवेसी परिवाराने गेल्या 40 वर्षांपासून हैदराबादमध्ये वचर्स्व प्रस्तापीत केले आहे. यांना पिढीजातच राजकारणाचे बाळकडू मिळाले आहे. सलाउद्दीन यांनी तब्‍बल सहा वेळा हैदराबादचे आमदारपद भू्षविले आहे. पित्‍याकडूनच त्‍यांनी राजकारणाचे धडे गिरवत स्‍वत:ला सिध्‍द केले आहे.
महाराष्ट्रातही एएमआयएमचा प्रवेश
'एमआयएम' संघटनेच्या रुपाने महाराष्ट्राच्या राजकारणात कट्टर मुस्लिमवादाचा प्रवेश झाला आहे. औरंगाबाद आणि भायखळा येथील जनतेने येथील दोन उमेदवारांना निवडून विधानसभेवर पाठविले आहे. औरंगाबाद पूर्व, पश्चिम, मालेगाव, परभणी, आणि सोलापूरसारख्या मतदारसंघात त्याचे उमेदवार दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळविले आहे.
असदउद्दीन ओवेसी
असदउद्दीनचा जन्म 13 मे 1969 रोजी हैदराबाद येथे झाला. त्यांचे शिक्षण बीए.,एल.एल.बी.,बॅरिस्टनर अॅट लॉ झाले असून ते सलग 2004 पासून ते आजतागायत हैदराबादमध्ये खासदार आहेत. संसदेमधील आपल्या. उत्कृष्ठ आणि प्रभावी मांडणीमुळे तसेच चांगल्या प्रभावामुळे त्यांना राष्ट्रीय पातळीचा लोकसभा 2014 चा ‘संसदरत्न’ पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. असदउद्दीन यांनी 1996 मध्‍ये फरहीन सोबत लग्‍न केले. त्यांना पाच मुली आणि एक मुलगा आहे.
असदउद्दीन ओवेसीचे वाद
असदउद्दीन यांना ‘संसदरत्न‍‘ पुरस्कार जरी मिळाला असला तरी वादाशी त्यांचे जवळचे नाते आहे. 2009 मध्ये निवडणुक आयोगाने असदउद्दीनवर प्रेक्षोभक भाषणामुळे खटला भरला होता. 2005 मध्ये असदउद्दीनने बिदर(कर्नाटक) येथे विनापरवानगी रॅलीचे आयोजन केले होते. सलमान खानच्या ‘जय हो’ या चित्रपटावर बंदीची त्यांनी मागणी केली होती. त्यावेळी सलमान खाननेही त्याचा खरपूर समाचार घेतला होता.
पुढील स्लाइडवर वाचा, सलमानने केलेली टीका... अकबरुद्दीनने केले ख्रिश्‍चन मुलीसोबत लग्‍न